Download App

Rohit Pawar : अजितदादांनी 200 कोटी रुपये वाटलेत : रोहित पवार यांचा भेदक आरोप

अजित पवार गट दमदाटी करत असल्याच्या अडीचशे तक्रारी आल्या आहेत. यातील 18 तक्रारी पैसे वाटपाच्या आहेत.

Image Credit: letsupp

Rohit Pawar on Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील अकरा मतदारसंघात मतदान होत आहे. यातील बारामती मतदारसंघाची राज्यभरात चर्चा आहे. आज मतदानाच्या दिवशीच येथे अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या ज्यामुळे मतदारसंघातील राजकारण ढवळून निघालं. आताही आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत अजित पवार गटावर गंभीर आरोप केले आहेत. अजित पवार गट दमदाटी करत असल्याच्या अडीचशे तक्रारी आल्या आहेत. यातील 18 तक्रारी पैसे वाटपाच्या आहेत. बारामती मतदारसंघात 155 बूथ संवेदनशील आहेत, त्याची माहिती आम्ही पोलिसांना दिली, असे रोहित पवार यांनी सांगितले.

या निवडणुकीत अजित पवार गटाकडून जवळपास 200 कोटींच्या आसपास पैसे वाटले गेले आहेत. 25oo रुपये झोपडपट्टीवाल्यांसाठी तर ज्यांच्याकडे वाहने आहेत त्यांच्यासाठी पाच हजार रुपये अशा पद्धतीने पैसे वाटण्यात आल्याचा गंभीर आरोप रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

सु्प्रिया सुळेंना लोकसभेचा पेपर अवघड जाणार? अजितदादांना हाताशी घेत भाजपने आखली रणनीती  

वेल्ह्यात बोगस मतदानाचा प्रयत्न

आज सकाळपासून आमचे कार्यकर्ते बूथच्या संपर्कात आहेत. बारामती लोकसभा मतदार 155 संवेदनशील बूथ आहेत. 250 छोट्या मोठ्या तक्रारी मिळाल्या आहेत. यामध्ये 18 तक्रारी या पैसेवाटपाच्या आहेत. 8 तक्रारी मारहाण आणि शिवीगाळीच्या आहेत. तर 38 तक्रारी ईव्हीएमबाबत आहेत. तसेच बोगस मतदान करण्याचा प्रयत्न वेल्हा येथे झाला असा आरोप रोहित पवार यांनी केला.

अजित पवार गटाकडून मतदारांना पैशांचं वाटप

पीडीसीसी बँक रात्री एक वाजेपर्यंत का सुरू होती. मार्च एन्ड असता तर समजू शकलो असतो. पण तशी परिस्थिती नाही. म्हणजेच येथून पाचशे रुपयांच्या नोटा वाटल्या जात होत्या असं आमचं ठाम मत आहे. निवडणुकीत पैशांचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जात आहे आणि तो काल परवापासून सुरू झाला आहे. पण काही लोकांना अजून पैसे मिळाले नसावेत आणि अजितदादा गटाचे लोक त्यांना म्हणत असतील थांब तुला काहीतरी पाठवतो मग मतदानाला जा. यामुळे मतदान कमी होत असावं अशी शक्यता रोहित पवारांनी व्यक्त केली.

..तर अजितदादांवर कारवाई झाली पाहिजे

आता आम्हाला अशी भीती आहे की दुपारी तीन साडेतीन वाजल्यापासून अजितदादांच्या गुंडांकडून ताब्यात घेण्यास सुरुवात करतील. त्यामुळे आम्ही याबाबत पोलीस प्रशासन आणि निवडणूक आयोगाला पत्र दिलं आहे. आम्ही सुद्धा व्हिडिओ शुटींग करणार आहोत आणि जर तसं घडलं तर अजित पवारांवर कारवाई झाली पाहिजे, असे रोहित पवार म्हणाले.

सुळेंना काकींची भेट घेतली त्यात काय चुकलं?

सुप्रिया सुळे काटेवाडीत मतदानानंतर काटेवाडीत आशा काकींना भेटायला गेल्या होत्या. आता जर त्यांच्या मुलाने स्वार्थी भूमिका घेतली असेल तर त्यात आईचं काय चुकलं. त्यामुळे आज सुप्रिया सुळे यांनी आशा काकींची भेट घेत संस्कृती जपली. त्यामुळे भेट घेतली यात काय चुकलं असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला.

follow us

वेब स्टोरीज