पुणे : आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईकरांना टोल माफीचा निर्णय देऊन खूश करण्यात आले आहे. त्याप्रमाणे बैठकीत पुणेकरांची वाहतूक कोंडींतून सुटका व्हावी यासाठीदेखील एक निर्णय घेण्यात आला आहे. आजच्या बैठकीत मंत्रिमंडळाने पुणे मेट्रो (Pune Metro) रेल टप्पा-२ मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच नागरिकांना खडकवासला ते हडपसर अन् नळस्टॉप ते माणिकबाग येथे मेट्रोने प्रवास करून जाता येणार आहे. या निर्णयानंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ (Murlidhar Mohol) यांनी महायुती सरकारचे आभार मानले आहेत. (Maharashtra Cabinet Sanction Two Track Of Pune Metro)
पुण्यात आणखी नवे दोन मेट्रो मार्ग !
१) खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी
२) नळस्टॉप-डहाणूकर कॉलनी-वारजे-माणिकबाग
या दोन मेट्रो मार्गांना महायुती सरकारने कॅबिनेट बैठकीत मंजुरी दिली असून यामुळे पुणे शहरातील मेट्रोचे जाळे आणखी भक्कम होणार आहे.
पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकीच्या…
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) October 14, 2024
टोल माफी ते कौशल्य विद्यापीठाला रतन टाटांचे नाव; शेवटच्या बैठकीत शिंदेंचे धडाकेबाज 19 निर्णय
शहरातील मेट्रोचे जाळे आणखी भक्कम होणार – मोहोळ
कॅबिनेटच्या निर्णयानंतर मुरलीधर मोहळ यांनी एक्सवर पोस्ट करत मेट्रोच्या नव्या दोन मार्गिकांबद्दल माहिती दिली आहे. यात त्यांनी खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी आणि नळस्टॉप-डहाणूकर कॉलनी-वारजे-माणिकबाग या दोन मेट्रो मार्गांना महायुती सरकारने कॅबिनेट बैठकीत मंजुरी दिल्याचे नमुद केले आहे. या निर्णयामुळे पुणे शहरातील मेट्रोचे जाळे आणखी भक्कम होणार असल्याचा विश्वास मोहळ यांनी व्यक्त करत पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणासाठी निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी आणि अजितदादा पवार यांचे मनःपूर्वक धन्यवादही मोहळ यांनी मानले आहेत.
Raj Thackeray : टोल आंदोलनाचं काय झालं? असं कुणी विचारलं तर, त्यांना मुंबईचं उदाहरण द्या!
शिवाजी नगर ते स्वारगेट भुयारी मार्गातील मेट्रो सुरू
महामेट्रोच्या पहिल्या टप्प्यात वनाज ते रामवाडी आणि पिंपरी चिंचवड ते स्वारगेट हे मार्ग होते. त्यानंतर नुकतेच शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअली लोकार्पण करण्यात आले. ही मार्गिका सुरू झाल्याने प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका झाली असून शिवाजीनगर ते स्वारगेट अंतर पार करण्यास केवळ 10 मिनिटांटा अवधी लागतो. त्यामुळे नागरिकांचा बहुमुल्य वेळही मोठ्या प्रमाणात वाचत आहे. शिवाजीनगर न्यायालय – स्वारगेट दरम्यान मेट्रोचे बुधवार पेठ (कसबा गणपती), महात्मा फुले मंडई आणि स्वारगेट स्थानके आहेत.
जाळे मेट्रोचे, पुण्याच्या प्रगतीचे…#पुणे #मेट्रो #खडकवासला #खराडी #नळस्टॉप #माणिकबाग #Pune #Metro #Khadakwasla #Kharadi #NalStop #ManikBaug @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks pic.twitter.com/N9Lx8PdvFM
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) October 14, 2024
असे आहेत तिकीट दर
– पीसीएमसी ते स्वारगेट – 30 रुपये
– वनाज ते स्वारगेट – 25 रुपये
– रामवाडी ते स्वारगेट – 35 रुपये
– जिल्हा न्यायालय ते स्वारगेट 15
– नळस्टॉप ते मंडई 20
– शिवाजीनगर ते मंडई 15
– स्वारगेट ते मंडई 10