Pune News : राज्यात निवडणुकाचं रण तापू (Maharashtra Elections) लागलं आहे. लवकरच निवडणुकीची घोषणा होईल. आचारसंहिता जाहीर होईल. राजकीय पक्षांचं जाागवाटप, उमेदवारांना तिकीट असे सोपस्कार होतील. मतदार मतदानही करतील. लोकशाहीच्या या (Pune News) उत्सवात लोकांना आपल्या मनातील उमेदवाराला मतदान करण्याचा अधिकार आहेच. पण त्याआधी सर्व्हेच्या माध्यमातून मतदारांचा कल कुणाच्या बाजूने आहे याचा अंदाज घेतला जातो. मतदारांना नेमकं काय हवंय याचाही अंदाज बऱ्याचदा घेतला जातो.
एक ऑनलाइन सर्व्हे घेण्यात आला. हा सर्व्हे अमेरिकेत स्थायिक झालेल्या तरुणांनी एका फाउंडेशनच्या माध्यमातून घेतला. या सर्व्हेतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील तरुणाईचा कल लोकशाहीच्याच बाजूने आहे. मात्र पुण्यातील ज्येष्ठ नागरिक हुकूमशाहीला प्राधान्य देत आहेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हा सर्व्हे करताना पुणेकरांना एकूण 86 प्रश्न विचारण्यात आले. त्यामाध्यमातून पुणेकर लोकशाही व्यवस्था, मतदान प्रक्रिया सामाजिक प्रश्नांबाबत कसा विचार करतात याची चाचपणी करण्यात आली. हा सर्व्हे करण्यासाठी जवळपास 2045 पुणेकरांकडून ऑनलाइन प्रश्नावली भरून घेण्यात आली.
Video : वाईट वाटलं, पावसामुळे मोदींचा पुणे दौरा रद्द झाला; आता त्यांनी.. सुळेंची मोठी मागणी
पुण्याची लोकसंख्या जवळपास 70 लाख आहे. शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत हा सर्व्हे अतिशय लहान आहे. परंतु या सर्व्हेच्या माध्यमातून पुण्यातील नागरिक कसा विचार करतात याचा अंदाज येऊ शकतो. या सर्व्हेतून असा अर्थ घेता येऊ शकतो की पु्ण्यातील तरुणाई खुल्या लोकशाहीच्या बाजूने आहे. तर याच शहरातील 56 वर्षांपुढील नागरिकांना हुकूमशाही भावते आहे का असे या सर्व्हेच्या माध्यमातून म्हणता येईल. तुम्ही एकतंत्री अंमल किंवा हुकूमशाहीला विरोध कराल का असाही एक उलट प्रश्न या सर्व्हेत विचारण्यात आला होता. त्यावर 69 टक्के पुणेकरांनी सांगितलं की आम्ही याला ठामपणे विरोध करू. तसेच 37 टक्के ज्येष्ठांनीही याला विरोध करणार असल्याचे सांगितले.
मतदान बंधनकारक करावं असं 76 टक्के पुणेकरांना वाटतं.
मतदान करणं गरजेचं आहे असं 90 टक्के पुणेकरांना वाटतं.
मतदान करताना विविध पक्षांच्या निवडीस तरुणांचं प्राधान्य
लोकसभा निवडणुकीत ज्यांना मतदान केलं त्याच पक्षाच्या उमेदवाराला विधानसभेत मतदान करणार असे 55 टक्के पुणेकर म्हणतात.
लोकसभा निवडणुकीत ज्यांना मतदान केलं त्याच पक्षाच्या उमेदवाराला विधानसभेत मतदान करणार असे म्हणणाऱ्यांत 67 टक्के ज्येष्ठ नागरिक आहेत.
18 ते 35 वयोगटातील 53 टक्के पुणेकरांना 56 हून अधिक वय असलेल्याड 70 टक्के लोकांना त्यांच्या मतांची नोंद होणं गरजेचं वाटतं.
मोठी बातमी! विनेश फोगाटला ‘नाडा’ची नोटीस; 14 दिवसांत मागितलं उत्तर, प्रकरण काय?
लोकशाहीच्या बाजूने 57 टक्के पुणेकर आहेत. निरंकुश सत्ता किंवा हुकूमशाहीच्या बाजूने 39 टक्के लोक आहेत.
18 ते 35 वयोगटातील 69 टक्के पुणेकरांनी मात्र कोणत्याही निरंकुश प्रकारच्या सत्तेला आमचा विरोध राहिल असे सांगितले.
कमी उत्पन्न असलेल्या 67 टक्के पुणेकरांना मात्र थेट लोकशाही हवी आहे. अल्प उत्पन्न असलेल्या 51 टक्के लोकांना लोकशाहीच हवी आहे.