प्रगतशील भारत आणि मेक इन इंडियासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण महत्वाचे; निकमार विद्यापीठाचा द्वितीय दीक्षांत समारंभ संपन्न

Nikmar University  : "प्रगतशील भारत आणि मेक इन इंडियासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण अत्यंत महत्वाचे आहे. पंतप्रधानांचे स्वप्न साकार करण्यासाठी

  • Written By: Published:
Nikmar University

Nikmar University  : “प्रगतशील भारत आणि मेक इन इंडियासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण अत्यंत महत्वाचे आहे. पंतप्रधानांचे स्वप्न साकार करण्यासाठी विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण कार्य करावे. संशोधनावर अधिक भर द्यावा आणि नवे तंत्रज्ञान शिकण्यासाठी सतत प्रयत्नशील असावे. विद्यार्थ्यांनी कधीही आपले ध्येय विसरू नये.” असे विचार निकमार विद्यापीठाच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आणि एच. सी. सी. लिमिटेडचे चेअरमन अजित गुलाबचंद यांनी व्यक्त केले.

बांधकाम क्षेत्रात देशात अग्रणी असलेल्या निकमार विद्यापीठाचा द्वितीय दीक्षांत समारंभ येथील निकमार विद्यापीठ पुणेच्या सभागृहात संपन्न झाला. त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी निकमार विद्यापीठाचे अध्यक्ष प्रा. डॉ. विजय गुपचूप, कुलगुरू डॉ. सुषमा एस कुलकर्णी, मॅनेजमेंट ॲडव्हायझर एच. सी. सी. लिमिटेड, शलाका धवन,  महासंचालक डॉ. तपशकुमार गांगुली, कुलसचिव डॉ. प्रशांत दवे व परीक्षा नियंत्रक डॉ. आदिनाथ दामले तसेच विद्यापीठाचे अधिष्ठाता व संचालक उपस्थित हेाते.

या दीक्षांत समारंभात एमबीए अ‍ॅडव्हॉन्स कंस्ट्रक्शन मॅनेजमेंटचा विद्यार्थी सौरभ राठी,  एमबीए इन अ‍ॅडव्हॉन्स प्रोजेक्ट मॅनेजमेंटची विद्यार्थीनी ईशानी राजेश तोरडमल,  एमबीए रिअल इस्टेट आणि अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंटचा विद्यार्थी समर्थ सिंग, मास्टर ऑफ बिजनेस अ‍ॅडमिस्ट्रेशनचा विद्यार्थी चेतन राकेश चव्हाण,  मास्टर ऑफ प्लांनिंगची विद्यार्थीनी वैष्णवी संतोष बांपलवार,  एमबीए इन एन्विरॉन्मेंटल सस्टेने बिलिटीची विद्यार्थीनी स्मिता संभाजी पाटील ,  एमबीए इन सस्टेनेबल एनर्जी मॅनेजमेंटची विद्यार्थीनी सावित्रा ए,  एमबीए इन फॅमिली बिझनेस अ‍ॅड आंत्रप्रेन्यूअरशीपचा विद्यार्थी नील दिनेश मदने,  पीजीडी इन क्लॉलिटी सर्वेयिंग अ‍ॅड कॉन्ट्रॅक्टस मॅनेजमेंटची विद्यार्थीनी अंजली सुरेश  आणि बॅचलर  ऑफ बिजनेस अ‍ॅडमिस्ट्रेशनची विद्यार्थीनी झाकिया शमशुद्दीन मुल्ला यांना सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले.  तसेच विविध विद्याशाखेतील 1128 हून अधिक पदवीधर विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.

अजित गुलाबचंद म्हणाले,” गुणवत्ता पूर्ण शिक्षणाने व शाश्वत विकासातूनच भारत 2047 मध्ये स्वयंपूर्ण  होऊन आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येईल. त्यासाठी वर्तमान काळात शाश्वत विकास देणाऱ्या शिक्षणाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही विद्या शाखेचे ज्ञानग्रहण केल्यानंतरही पर्यावरण रक्षण व संतुलनासाठी कार्य करावेच लागेल. शिक्षण आणि नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे यशाची शिखरे चढता येतात, प्रामाणिकतेने हे शक्य होऊ शकते. विद्यार्थ्यांनी मजबूत निर्मितीसाठी कठोर परिश्रम घेऊन मानवता समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत.”

डॉ. विजय गुपचुप म्हणाले,” आपण सर्व इंजिनियर असून शिक्षण आणि कौशल्याच्या माध्यमातून या क्षेत्रातील सर्व समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यामुळे कोणत्याही समस्यांचे निराकरण करण्यासाठी कोणत्याही प्रकारची तडजोड करू नये आणि आपण वेळेचे व पैश्याचे व्यवस्थित नियोजन करावे.

डॉ.  सुषमा कुलकर्णी म्हणाल्या,” विद्यार्थ्यांनी  आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रथमता, कंफोर्ट झोन, फियर झोन, लर्निंग झोन, ग्रोथ झोन व  तदनंतर  ट्रान्सफॉरमेशन झोन या 5 झोन मधून पुढे जावे लागते.  या झोन मधून विद्यार्थी यशश्वीरित्या पुढे गेले तरच त्यांचे करियर उज्वल होईल. निकमार विद्यापीठाच्या माध्यमातून आम्ही बांधकाम क्षेत्रातील जागतिक स्तरावरील पाठ्यक्रम सुरू केले आहेत.

एसटीला दिवाळीतच ‘अंधार’ तिकीट महसुलात सरासरी 6 कोटींची दैनंदिन तूट

विद्यापीठाने वेळोवेळी विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्य विकसित करण्यासाठी मार्गदर्शन केले आहे.” डॉ. प्रशांत दवे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. ज्योतिष सिंग, प्रो. श्रीलक्ष्मी श्रीकुमार यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. आदिनाथ दामले यांनी आभार मानले.

follow us