Raj Thackeray : गुढीपाडवा मेळाव्याच्या भाषणानंतर राज ठाकरे विरोधात पुण्यात पोलिसात तक्रार

पिंपरी : मुंबई येथील ‘शिवतीर्थ’ अर्थात शिवाजी पार्क मैदानावर गुढीपाडवा मेळाव्यानिमित्ताने राज ठाकरे (Raj Thackeray) यांचं काल (ता.22 मार्च) जोरदार भाषण झालं. (Maharashtra News) या भाषणात त्यांनी मस्जिदीवरील भोंगे, सांगलीतील अनधिकृत मस्जिद बांधकाम आणि मुंबईतील माहीमच्या खाडीत उभारण्यात आलेला (pune political) अनधिकृत दर्ग्या संदर्भात राज्य सरकारला अल्टिमेटम दिला होता. दरम्यान, भाषण होऊन काही तास उलटत […]

Raj Thackeray

Raj Thackeray

पिंपरी : मुंबई येथील ‘शिवतीर्थ’ अर्थात शिवाजी पार्क मैदानावर गुढीपाडवा मेळाव्यानिमित्ताने राज ठाकरे (Raj Thackeray) यांचं काल (ता.22 मार्च) जोरदार भाषण झालं. (Maharashtra News) या भाषणात त्यांनी मस्जिदीवरील भोंगे, सांगलीतील अनधिकृत मस्जिद बांधकाम आणि मुंबईतील माहीमच्या खाडीत उभारण्यात आलेला (pune political) अनधिकृत दर्ग्या संदर्भात राज्य सरकारला अल्टिमेटम दिला होता.

Black Gudi | काळी गुढी उभारून केला सरकारचा निषेध | LetsUpp Marathi

दरम्यान, भाषण होऊन काही तास उलटत नाही तोच जिल्हाधिकारी आणि मुंबई महापालिकेने माहीम येथील दर्ग्यावर कारवाई केली आहे. यामुळे राज ठाकरेंनी हिंदू मुस्लिम समाजात तेढ निर्माण होईल,असं भाषण केल्याचा आरोप करत तक्रारदार बाजीद रजाक सय्यद यांनी पिंपरी चिंचवडच्या वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

सय्यद यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, राज ठाकरे यांनी २२ मार्च रोजी केलेले भाषण हिंदू-मुस्लीम समाजात भांडण लावणार आहे. त्यांच्या भाषणामुळे मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांचे संपूर्ण भाषण राजकीय दबाबाखाली केले गेले असून रमजान महिन्यात केलेल्या या भाषणामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे राज ठाकरे यांच्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच त्यांना यापुढे भाषणासाठी परवानगी देऊ नये, अशी मागणी तक्रारदार सय्यद यांनी वाकड पोलीस ठाण्यात केली आहे.

विरोधकांनी असं म्हणायचं असतं पण, सरकार काही.. चंद्रकांतदादांची फटकेबाजी..

दरम्यान, राज ठाकरे यांनी काल केलेल्या भाषणात राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरलं. प्रशासनाचा दुर्लक्ष झालं तर काय होतं असा उदाहरण देत त्यांनी माहीम येथील खाडीत अनधिकृत रित्या उभारलेल्या दर्ग्याचं चित्रणच भर सभेत दाखवलं. येथील अतिक्रमण एका महिन्यात जर हटवलं नाही तर त्या बाजूला सर्वात मोठा गणपती मंदिर बांधण्यात येईल, असा इशाराच त्यांनी दिला होता. मात्र, भाषणाच्या काही तासानंतरच महापालिका प्रशासन, जिल्हाधिकारी यांनी पोलिसांच्या साथीने हे अतिक्रमण हटवला आहे.

तसेच, सांगली येथे देखील अनधिकृत मस्जिद बांधण्यात येत असल्याचं  राज यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे. याबरोबरच मज्जिदीवरील भोंगे सुद्धा जोरात वाजायला सुरुवात झाली आहे. यावर राज्य सरकारने कारवाई करावी अन्यथा आमच्याकडे दुर्लक्ष कराव, असा इशाराही त्यांनी दिला आहे. राज यांच्या भाषणानंतर माहीम येथील दर्ग्यावर झालेली कारवाई पाहता सांगली येथील मज्जिद आणि भोंग्यावर देखील राज्य सरकार कारवाई करेल, असं बोललं जात आहे.

Exit mobile version