विरोधकांनी असं म्हणायचं असतं पण, सरकार काही.. चंद्रकांतदादांची फटकेबाजी..
Chandrakant Patil : सरकार लवकरच पडणार सरकारचे काही खरे नाही असे विरोधकांकडून नेहमीच म्हटले जाते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील तर हे वक्तव्य नेहमीच देत असतात. त्यांना आज मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रत्युत्तर दिले. पाटील म्हणाले, की विरोधी पक्षांनी असं म्हणायचचं असतं. त्यांच्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही. न्यायालयाच्या मुद्द्यावर टीप्पणी न करण्याचे पथ्य मी नेहमीच पाळतो. मात्र, सरकार काही पडत नाही असे पाटील यांनी ठणकावून सांगितले. मंत्री पाटील यांनी आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
ते पुढे म्हणाले, की आगामी सर्व निवडणुकीत भाजप आणि शिवसेना ताकदीने उतरणार आहे. या निवडणुकीत बहुमत मिळेल यासाठी आमचे प्रयत्न राहतील. भारतीय जनता पार्टीच्या प्रयत्नांचा शिवसेनेलाही फायदा होईल.
सरकारने जाहीर केलेला आनंदाचा शिधा अजूनही लाभार्थ्यांना मिळाला नाही म्हणून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. गुढीपाडव्याच्या वेळेस शिधा मिळेल असे सांगितले जात होते मात्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे या वेळेत शिधा पोहोच करणे शक्य झाले नाही. त्यामुळे सरकारला विरोधकांनी घेरले असताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोर्चा सांभाळला आहे.
ते म्हणाले, की राज्य सरकारने दिवाळीच्या वेळीही आनंदाचा शिधा दिला होता. त्यावेळीही असेच काहूर उठवले होते की शिधा पोहोचणार की नाही पोहोचणार की नाही. मात्र, हा शिधा पोहोचला. तसेच आताही राज्यातील एक कोटी 58 लाख लाभार्थ्यांना हा शिधा मिळेल. मध्यंतरी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे थोडा उशीर झाला मात्र आता तशी कोणतीही अडचण येणार नाही, असे त्यांनी सांगितले.
वाचा : …म्हणून चंद्रकांत पाटील म्हणाले, मी अजितदादांपेक्षा सिनिअर
पाटील म्हणाले, की ग्लास अर्धा रिकामा आहे असे म्हणण्यापेक्षा ग्लास अर्धा भरलेला आहे असे म्हणणे हे सकारात्मक मानसिकतेचे लक्षण आहे. आणि त्या मानसिकतेत मी असतो. आनंदाचा शिधाही राज्यातील सर्व लाभार्थ्यांना लवकरच मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी नागरिकांनी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. माझा नवीन वर्षाचा संकल्प हा अदृश्य जनतेची सेवा ही परमेश्वराची सेवा मानून. गरीबांच्या सेवेची कामे अधिकाधिक वाढावीत हा आहे.
सरकार लवकरच पडणार असल्याचे विरोधकांकडून सांगितले जात आहे. त्यावर पाटील म्हणाले, की विरोधी पक्षांचे तसे म्हणणे हे त्यांचे कामच आहे. त्याने काहीच फरक पडत नाही. आगामी काळात सर्व निवडणुकी भाजप आणि शिवसेना एकत्रितच लढणार आहोत त्यामुळे काळजी करण्याचे काहीच कारण नाही असे पाटील म्हणाले.
Sanjay Kakade : कसब्याचा पराभव कोणामुळे? चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे
राज ठाकरेंना दिल्या खास शुभेच्छा
राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याच्या सभेची उत्सुकता तर सगळ्यांनाच आहे. त्यांचे जे आहे फॉलोइंग आहे ते आता मतांत रुपांतरीत झाले पाहिजेत. आणि ते राज्यातील एक चांगले राजकीय ताकद म्हणून तयार झाले पाहिजेत अशा शुभेच्छा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिल्या. मी राजकारणात फिट बसत नाही असे ठाकरे म्हणाले होते त्यावर पाटील म्हणाले, की मी राजकारणात फिट बसत नाही असे म्हणण्याला चांगल्या माणसांना परवानगी नाही.