Download App

ठाकरे सेनेला धक्का! पुण्यात शिंदेंची दमदार वाटचाल; सुषमा अंधारेंच्या निकटवर्तीयाची संघटकपदी वर्णी

सुषमा अंधारे यांचे निकटवर्तीय आनंद गोयल यांची एकनाथ शिंदे शिवसेनेच्या संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Maharashtra Politics : शिवसेना ठाकरे गटाच्या फायरूब्रँड नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांना जोरदार झटका बसला आहे. सुषमा अंधारे यांचे निकटवर्तीय आनंद गोयल यांची एकनाथ शिंदे शिवसेनेच्या संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यापासून ठाकरे गटाला गळती लागली आहे. आतापर्यंत अनेक पदाधिकारी, कट्टर शिवसैनिक, माजी आमदारांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आहे. दोनच दिवसांपूर्वी नाशकात माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला होता. आनंद गोयल यांनी विधानसभा निवडणुकीत सुषमा अंधारे यांच्या समर्थनात बॅनरबाजी केली होती. अंधारेंनी पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघातून निवडणूक लढवावी असे होर्डिंग लावण्यात आले होते.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत मोठी इनकमिंग सुरू झाली आहे. काही आजी-माजी नगरसेवकही नाना भानगिरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत करणार प्रवेश आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि जुने शिवसैनिक आनंद गोयल यांची पुणे शहर संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती २४ मे रोजी शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली.

आनंद गोयल हे अलीकडेच शिवसेना (उद्धव ठाकरे गट) सोडून शिवसेनेत (शिंदे) दाखल झाले होते. प्रमोद नाना भानगिरे यांनी विश्वास व्यक्त केला की आनंद गोयल आपल्या कार्यातून आणि प्रचार-प्रसाराच्या माध्यमातून शिवसेनेला पुणे शहरात नवीन उंचीवर घेऊन जातील व समर्पित कार्यकर्त्यांच्या सहकार्याने संघटनेला भक्कम आधार देतील.

वैष्णवी हगवणे प्रकरणात CID चौकशी करा नाहीतर…, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

नाशिकमध्ये माजी आमदार फोडला..

माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या (Eknath Shinde) उपस्थितीत शुक्रवारी सायंकाळी दराडे यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. विधानसभा निवडणुकीत तर दराडे यांनी थेट छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना आव्हान दिले होते. परंतु, ते पराभूत झाले होते.

शिवसेना एकसंध होती त्यावेळी शिवसेनेने दराडे यांना नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था गटातून आमदारकीची संधी दिली होती. अलीकडेच त्यांच्या आमदारकीची मुदत संपली होती. त्यामुळे दराडे आता पुढे काय करणार असा प्रश्न विचारला जात होता. दराडे यांचे बंधू किशोर दराडे शिंदे गटात आहेत. तेव्हा आता नरेंद्र दराडे देखील शिंदे गटात जाणार अशी चर्चा रंगली होती. या चर्चा अखेर खऱ्या ठरल्या. दराडे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Elections) होणार आहेत.

एकनाथ शिंदेंची स्मार्ट खेळी! नाशकात ठाकरेंचा माजी आमदार फोडला; भुजबळांनाही शह देणार?

follow us