Download App

Maharashtra Politics : शरद पवार- अजितदादा एकत्र येणार का? अंकुश काकडे काय म्हणाले?

अजित पवारांनीही फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा सोडली नाही. त्यामुळं जो निर्णय व्हायचा तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी व्हावा.

Ankush Kakade : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूंकप होणार असल्याचे संकेत शरद पवारांनी (Sharad Pawar) काही दिवसांपूर्वी दिलेत. आमच्या पक्षात दोन मतप्रवाह आहेत, त्यातील एका गटाला अजित पवारांसोबत (Ajit Pawar) जावं वाटतं, असं विधान पवारांनी केलं. तेव्हापासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली. यावर आता अंकुश काकडेंनी (Ankush Kakade) भाष्य केलं.

ब्रेकिंग : प्रतिक्षा संपली, धाकधूक वाढली; उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल 

अंकुश काकडेंनी आज माध्यमांशी चर्चा केली. यावेळी त्यांना सुप्रिया सुळेंना लिहिलेल्या पत्राविषयी विचारले असता ते म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा माध्यमांमध्ये सुरू झाल्यात. कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहे. मात्र, पवार साहेाबांनी स्पष्टीकरणं दिलं की, सुप्रिया सुळे, जयंत पाटील एकत्रिकऱणाच्या सदर्भात निर्णय घेतील. आता सुप्रिया सुळे काय निर्णय घेतील, याची मला कल्पना नाही. मात्र, एक नेता म्हणून सद्याची पक्षाची परिस्थिती, कार्यकर्त्यांचं मनोगत हे त्यांना सांगणं माझं कर्तव्य आहे. त्यामुळं त्यामुळं मी त्यांना सविस्तर पत्र दिलं. मला त्यांची समक्ष भेट घ्यायची आहे. उद्या-परवा मी सुप्रियाताईंची भेट घेईल. या पत्रात पक्षाची परिस्तिथी, कार्यकर्त्यांच्या भावना, आणि आगामी निवडणुकांचा परमामर्श केला.

ब्रेकिंग : प्रतिक्षा संपली, धाकधूक वाढली; उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल 

मी पवार साहेबांची साथ सोडणार नाही…
काकडे म्हणाले, मी पत्रात स्पष्ट केलं. 1978 पासून मी पवारसाहेबंचा सैनिक म्हणून काम करतोय. पवार साहेब जो निर्णय घेतील, त्या निर्णयाशी मी बांधिल राहिलो. भविष्यकाळातही मी पवार साहेबांची साथ सोडणार नाही, असं ते म्हणाले.

दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं का?
दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं का, असा सवाल केला असता काकडे म्हणाले, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्यानंतर पक्षाची काय स्थिती आहे? हे अनेकवेळी मी पक्षाच्या बैठकीत मांडलं. येत्या 14 तारखेला प्रदेश कार्यकारणीची बैठक आहे. त्यात मी माझी भूमिका स्पष्ट करेल, असं सांगत काकडे म्हणाले की, अजितदादा गटात आणि आमच्या पक्षात मतमतांतरे आहेत. पण, अजित पवारांनीही फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा सोडली नाही. त्यामुळं जो निर्णय व्हायचा तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी व्हावा, असं काकडे म्हणाले.

मध्यंतरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची चर्चा सुरू झाली. ते तर 2008 पासून वेगळे झाले आहे. त्यांचीही एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू आहे. अजितदादा-सुप्रिया सुळे तर अडीच-तीन वर्षापूर्वीच वेगळे झाले. राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाची चर्चा माध्यमांमध्ये सुरू आहेत. मात्र, दोन्ही गटांचे एकत्रिकरण झाले तर आपलं भविष्य अडचणीत येऊ शकत, महत्व कमी होऊ शकतं, असं वाटणारी दोन्ही मंडळी पक्षात आहे, असंही काकडे म्हणाले.

 

follow us