Ajit Pawar on Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून अजित पवार (Ajit Pawar) सत्तेत सहभागी झाले. अजित पवारांचा गट महायुती सरकारमध्ये आहे. स्वतः अजित पवार अर्थमंत्री आहेत. त्यांच्या काही आमदारांना मंत्रिमंडळात महत्वाची खाती मिळाली आहेत. यानंतर अजित पवार यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबतीत पुन्हा एक मोठं वक्तव्य केलं आहे. मी शरद पवार यांना कालही दैवत मानत होतो, आजही मानतो. पण तळ्यात मळ्यात केल्यास निर्णय घेता येत नाही, असे अजित पवार म्हणाले. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात अजित पवार बोलत होते.
अजित पवार पुढे म्हणाले, आम्ही निर्णय घेतलाच ना. शरद पवार यांना आम्ही घरात दैवत मानत होतो. आजही मानतो. पण आज देशाला मोदींसारखा नेता मिळालाय. त्यांच्या पाठीशी उभा राहणं आणि देशाची प्रगती करणं खूप महत्वाचं आहे. आम्ही स्वार्थ पाहणारी माणसं नाही. आम्हीही जनहिताची कामं केली आहेत. पिंपरीत आधी आपल्याकडे एकच मतदारसंघ होता. आता तीन झालेत. 2029 मध्ये पाच झाले तर आश्चर्य वाटून घेऊ नका असेही अजित पवार म्हणाले.
अजित पवार बीडमध्ये दाखल होताच अधिकाऱ्यांवर संतापले; म्हणाले तुम्हाला फक्त चार तास देतो
अण्णा बनसोडे गरीब कुटुंबातील कार्यकर्ते आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांना सांगून त्यांना विधानसभेचं उपाध्यक्ष केलं. पान टपरी चालवणारे अण्णा आता आमदार आहेत. आधी नगरसेवक होते. आता उपाध्यक्ष झाले आहेत. 1991 मध्ये मी येथे आलो तेव्हा गाववाले आणि बाहेरचे अशी खूप चर्चा व्हायची. पण आता अण्णा बनसोडे हे देखील इथलेच आहेत असे अजित पवार यावेळी म्हणाले.