Download App

उद्या शिरुरमधून अजित पवारही इच्छुक असेल, तुम्हाला काय त्रास? अजितदादांचा सवाल

Ajit Pawar on Shirur Lok Sabha : राज्यात आता लोकसभा निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. महाविकास आघाडीकडून जागावाटपासाठी मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. राष्ट्रवादीकडून मतदारसंघनिहाय आढावा घेतला जात आहे. त्यातच आता शिरुर लोकसभा (Shirur Constitueny) मतदारसंघ चर्चेत आला आहे. या मतदारसंघात माजी आमदार विलास लांडे यांनी निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. त्यामुळे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना आव्हान निर्माण झाले आहे. या मुद्द्यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली.

पवार म्हणाले, शिरुर मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवारीबाबत माध्यमांनी आजिबात काळजी करू नये. शिरुरमध्ये अनेक जण इच्छुक असतील तर त्यात काय बिघडलं. शिरुरसाठी उद्या अजित पवार इच्छुक असतील तर तुम्हाला काय त्रास आहे?, असा सवाल त्यांनी केला.

राष्ट्रवादीतूनचं शड्डू पडल्यानंतर कोल्हेंच्या लांडेंना शुभेच्छा; म्हणाले, शर्यत अजून….

या मतदारसंघासाठी दोघांमध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे. यांसदर्भात विचारलेल्या प्रश्नांवर पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, विलास लांडे माजी आमदार आहेत.त त्यांना आम्ही महापौर केलं होते. खासदारकीची उमेदवारीही दिली होती. त्यावेळी त्यांना अपयश आलं. आता त्यांनी अधिक जोमाने गोळाबेरीज आणि आकडेमोड केली असेल, त्यामुळे ते इच्छुक असतील.

खासदार कोल्हे आणि विलास लांडे या दोघांचेही वक्तव्य ऐकलं आहे. तो आमचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. येथे तोडीस तोड उमेदवार देण्याचा आमचा प्रयत्न राहिल. मागील वेळी अमोल कोल्हे हेच शिरुरसाठी योग्य उमेदवार वाटतात असे सांगून मी त्यांचा पक्षप्रवेश घडवून आणला होता. त्यानंतर त्यांना तिकीट देण्यात आले आणि निवडून आणले, असे पवार म्हणाले.

कोल्हे की लांडे? जयंत पाटील म्हणतात अमोल कोल्हे उत्तम उमेदवार

राष्ट्रवादीत बरेच चांगले चेहरे इच्छुक आहेत. तरी काँग्रेस, शिवसेनेशी चर्चा केल्यानंतर आम्ही ठरवू. अमोल कोल्हे हे आमचे उत्तम उमेदवार आहेत. त्यांनी लोकसभेत चांगले काम केले आहे. या व्यतिरिक्त आणखी काही चांगले उमेदवार शिरुर मतदारसंघात आहेत ज्यांचं तिथं चांगलं काम आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.

Chandrasekhar Bawankule : ‘मी पंकजाताईंच भाषण ऐकलं, BJP माझ्या मागे असल्याचे त्यांनी म्हटलं’

Tags

follow us