Download App

Baramati Lok Sabha : रोहित अन् पार्थ पवार एकाच वाहनात; बारामतीच्या हायहोल्टेज लढतीत नवं पॉलिटिक्स

Baramati Lok Sabha Election 2024 : बारामती मतदारसंघातील निवडणुकीची यंदा देशभरात (Baramati Lok Sabha Election 2024) चर्चा आहे. याचं कारण म्हणजे या मतदारसंघात पवार कुटुंबातीलच सदस्यांत लढत होत आहे. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उमेदवारी करत आहेत. या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारात पवार कुटुंबातील जुनी आणि नवी पिढी दिसत आहे. जुन्या पिढीतील नेते एकमेकांच्या विरोधात प्रचार करत आहेत. त्यांना नव्या पिढीतील युवा नेत्यांचीही साथ मिळत आहे. पण, अनेकदा असेही प्रसंग घडत आहेत जेव्हा ही मंडळ एकत्र दिसतात. असाच एक प्रसंग नुकताच घडला. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार एकाच वाहनात दिसले.

हिंजवडीच्या बगाड यात्रेत दोघेही एकाच गाडीवर होते. बगाड यात्रेच्या गाडीवर पार्थ पवार आणि रोहित पवारांनी एकमेकांना सांभाळून घेत होते. तसं पाहिलं तर या दोघांमध्ये फारसा संवाद नाही परंतु, ऐन निवडणुकीच्या धामधुमीत दोघे एकत्रित दिसल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

Baramati Agro : साडेतीन लाख लोकांच्या कुटुंबाशी खेळ, ईडीच्या कारवाईनंतर रोहित पवार आक्रमक

या यात्रेनंतर रोहित पवार मुळशी येथे महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी निघून गेले. या ठिकाणी त्यांनी अजित पवार यांच्यावर घणाघाती टीका केली. भाजपाचा पराभव करण्यासाठी पवार साहेब राज्यभरात फिरत आहेत. पण पवार साहेबांचे वय काढणारे फक्त बारामती मतदारसंघातच फिरत आहेत, असा खोचक टोला रोहित पवार यांनी लगावला.

 

follow us

वेब स्टोरीज