Download App

Anil Ramod : पुण्यातील लाचखोर आयएएस अधिकारी अनिल रामोड अखेर निलंबित

Anil Ramod : पुण्यातील लाचखोर अधिकारी अनिल रामोडसंदर्भात (Anil Ramod) मोठी बातमी समोर आली आहे. विभागीय आयुक्तालयातील अतिरिक्त आयुक्त अनिल रामोड याला अखेर निलंबित करण्यात आले आहे. यासंदर्भातील आदेश आज विभागीय आयुक्तालयाला मिळाले. रामोड याला 8 लाख रुपयांची लाच घेताना सीबीआयने 10 जून रोजी रंगेहाथ अटक केली होती. महामार्गालगतच्या जमिनीशी संबंधित हा व्यवहार होता. तपासाला गती मिळावी यासाठी रामोडला निलंबित करावे अशी मागणी सीबीआयने विभागीय आयुक्तांना केली होती. त्यानंतर रामोडला निलंबित केल्याचा आदेश कार्यालयात येऊन धडकला.

IAS Anil Ramod: पुण्यातील अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचे ‘घबाड’ ! पैसे मोजताना सीबीआय अधिकाऱ्यांची दमछाक

रामोडला निलंबित करावे. प्रकरणाच्या सखोल तपासासाठी त्याच्या निलंबनाची आवश्यकता आहे, अशी शिफारस सीबीआयने विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली होती. त्यानुसार विभागीय आयुक्तालयाने रामोड याला निलंबित करण्यासाठी प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता. यानंतर राज्य सरकारने निलंबनाचा प्रस्ताव मंजूर केला. या बाबतचे आदेश काल विभागीय आयुक्तालयाला मिळाल्याचे सांगण्यात आले.

निलंबनानंतर रामोड याने पुणे मुख्यालय सोडू नये, कोणतीही खासगी नोकरी स्वीकारू नये असे या आदेशात म्हटले आहे. तसेच पुण्याबाहेर जायचे असेल तर विभागीय आयुक्तांची परवानगी घेणे बंधनकारक राहिल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

सीबीआयने रामोड यांचे कार्यालय, क्विन्स गार्डन येथील सरकारी निवासस्थान आणि बाणेर येथील ‘ऋतुपर्ण’ सोसायटी या खाजगी निवासस्थानीही छापा टाकला होता. तसेच त्याच्या गावी जाऊन तेथेही झडती घेतली होती. याठिकाणी काही महत्वाची कागदपत्रे सीबीआय अधिकाऱ्यांच्या हाती लागली होती. रामोड याच्या पत्नीच्या नावे काही कंपन्या असल्याचेही समोर आले होते. रामोड सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

IAS अनिल रामोडला लाच घेताना पुण्यात अटक : घरातील नोटा मोजण्यासाठी सीबीआयने आणले दोन मशीन

सीबीआयने पुण्यात धाड टाकली होती. यावेळी अनिल रामोड यांना 8 लाख रुपयांची लाच घेताना सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर या प्रकरणात सीबीआयने आणखी सखोल तपास सुरू केला. या तपासातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. रामोड याच्या पुण्यातील कार्यालये आणि निवासस्थानी सीबीआयचे पथक धडकले. जवळपास 6 कोटी 64 लाख रुपये रक्कम आढळून आली. काही दागिने आणि कागदपत्रेही जप्त करण्यात आली.

Tags

follow us