Pune Lok Sabha Election : पुण्यातील लोकसभेची निवडणूक चर्चेत (Pune Lok Sabha Election) आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचा उमेदवार अजून ठरलेला नाही. तर दुसरीकडे या जागेवरून मनसेतही अंतर्गत धुसफूस वाढली आहे. याचं कारण म्हणजे या जागेसाठी पक्षात दोन दावेदार आहेत. परंतु, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अद्याप ग्रीन सिग्नल दिलेला नाही. त्यातच मनसे नेते वसंत मोरे (Vasant More) आपण लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे संकेतही देत आहेत. आताही वसंत मोरे यांनी एक फेसबूक पोस्ट लिहीली आहे. या पोस्टची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मध्यरात्री 12 वाजता त्यांनी ही पोस्ट लिहिली आहे. एका मर्यादेबाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो. आता आपली कुणाकडून काहीही अपेक्षा नाही, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
पुणे लोकसभेसाठी वसंत मोरे इच्छुक आहेत. त्यांनी याआधीही स्पष्टपणे तसे सांगितले आहे. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत नाशिक येथे झालेल्या मेळाव्यातही त्यांनी इच्छा बोलून दाखवली होती. आपल्यालाच तिकीट मिळेल याबद्दल ते आश्वस्तही दिसत होते. परंतु, या तिकीटाच्या स्पर्धेत शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचीही एन्ट्री झाली त्यानंतर मात्र चित्रच बदलले.
Vasant More : नाव घेतलं की अख्खं शहर हलतंय; ठाकरेंच्या शिलेदारची सूचक पोस्ट
या जागेसाठी मनसेतच दोन दावेदार सध्या तरी दिसत आहे. त्यामुळे कुणाला तिकीट द्यायचं हे अद्याप ठरताना दिसत नाही. त्यामुळेच वसंत मोरे यांची घालमेल वाढली आहे. मध्यंतरी अमित ठाकरे यांनी पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर मोर्चा काढला होता. त्यावेळी अमित ठाकरे यांनी वसंत मोरे यांच्यातील संवादाची मोठी चर्चा झाली होती.
वसंत मोरे यांनी काही दिवसांपूर्वी खासदार शरद पवार (Sahrad Pawar) आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriye Sule) यांची भेट घेतली. पुण्यातील एका मैदानाच्या प्रश्नासाठी भेट घेतल्याचे वसंत मोरे यांनी स्पष्ट केले होते. मात्र निवडणुका जवळ आलेल्या असतानाच त्यांनी ही भेट घेतल्यानेही राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या.
यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा फेसबूक पोस्ट लिहीत सगळ्यांनाच कोड्यात टाकलं आहे. लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांची खास स्टाईल असते. त्यामु्ळेच ते येथील जनतेत प्रसिद्ध आहेत. परंतु, आता वसंत मोरेंनाच नेमका कुणाचा त्रास आहे, त्यांची कोंडी कुणाकडून केली जात आहे. त्यांनी फेसबूकवर लिहीलेल्या या पोस्टचा अर्थ काय याची चर्चा आता सुरू झाली आहे.
‘मी पट्टीचा गारुडी!’ बाबर की मोरे? पुण्यात ‘मनसे’चा उमेदवार कोण? मोरेंच्या स्टेटसने भूकंपाचे संकेत