“मी पट्टीचा गारुडी!” बाबर की मोरे? पुण्यात ‘मनसे’चा उमेदवार कोण? मोरेंच्या स्टेटसने भूकंपाचे संकेत

“मी पट्टीचा गारुडी!” बाबर की मोरे? पुण्यात ‘मनसे’चा उमेदवार कोण? मोरेंच्या स्टेटसने भूकंपाचे संकेत

Lok Sabha 2024 : पुण्यात लोकसभा निवडणुकांसाठी मैदान तयार (Lok Sabha Election 2024) होत आहे. जागावाटपाचा अंतिम निर्णय झालेला नसला तरी इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. यंदा मनसेही (MNS) पुण्यात उमेदवार देणार आहे. उमेदवार कोण असेल याचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. मात्र, या उमेदवारीवरून मनसेच्या आजी माजी शहराध्यक्षांत वाद धुमसू लागला आहे. वसंत मोरे की साईनाथ बाबर अजून ठरलेलं नाही मात्र वसंत मोरे (Vasant More) यांनी व्हॉट्सअपला ठेवलेल्या एका स्टेटसची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. “कुणासाठी कितीही करा, वेळ आली की फणा काढतातच पण, मी पट्टीचा गारुडी आहे” अशा आशयाचं स्टेटस आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पत्नी शर्मिला ठाकेरे यांनी मनसे नेते विद्यमान शहराध्यक्ष साईनाथ बाबर (Sainath Babar) यांच्या खासदारकीचे संकेत दिले होते. त्यामुळे मोरे यांचे हे स्टेटस नेमके कुणाला उद्देशून आहे, याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

..तर मी पुणे लोकसभेची पोटनिवडणूक लढवणार; वसंत मोरेंनी वाढवले भाजपचे ‘टेन्शन’

तसं पाहिलं तर वसंत मोरे आणि साईनाथ बाबर या दोघांनीही उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पुणे लोकसभेचं तिकीट मिळावं यासाठी दोघांनीही पक्षनेतृत्वाला गळ घातली होती. त्यानंतर वसंत मोरे यांनी शहरभर बॅनरबाजी करत आपणच मनसेचे लोकसभेचे उमेदवार असल्याचे सांगितले होते. तर दुसरीकडे साईनाथ बाबर यांनीही आपण लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे म्हटले होते.

वसंतला मला दिल्लीला पहायचं आहे असे वक्तव्य शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. तसेच साईनाथ बाबर दिल्लीला गेला तर दुधात साखर पडेल असेही वक्तव्य त्यांनी बाबर यांच्या कार्यक्रमात केले होते. या वक्तव्यानंतरच वसंत मोरे यांनी सूचक स्टेटस ठेवल्याची चर्चा सुरू आहे. “कुणासाठी कितीही करा, वेळ आली की फणा काढतातच पण, मी पट्टीचा गारुडी आहे. योग्य वेळी सगळी गाणी वाजवणार” असे मोरेंनी लिहिले आहे.

राज ठाकरेंनी आरे वसंत कुठे आहे रे? म्हणताच वसंत मोरे काही मिनिटातच..

अहवाल राज ठाकरेंकडे रवाना 

पुण्यात मनसेचा उमेदवार कोण असेल याची चाचपणी पक्षाच्या वरिष्ठांकडून केली जात आहे. काही जणांच्या नावांची चर्चाही झाली आहे. राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे पुणे लोकसभेचे प्रभारी आहेत. त्यांनी पु्ण्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या आहेत. या बैठकांचा अहवाल राज ठाकरे यांना देण्यात आला आहे. यानंतर आता पुणे लोकसभेचं तिकीट कुणाला मिळणार हे एक कोडं बनलं आहे. वसंत मोरे की साईनाथ बाबर यांपैकी कुणाला तिकीट मिळणार की ऐनवेळी तिसराच उमेदवार रिंगणात येणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज