: …तर मी पुणे लोकसभेची पोटनिवडणूक लढवणार’, वसंत मोरेंनी वाढवले भाजपचे ‘टेन्शन’

  • Written By: Published:
: …तर मी पुणे लोकसभेची पोटनिवडणूक लढवणार’, वसंत मोरेंनी वाढवले भाजपचे ‘टेन्शन’

Vasant More On Pune Lok Sabha by Election: खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त झाल्यानंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागेल आहेत. यामध्ये महाराष्ट्र निवनिर्माण सेने (MNS) देखील तयारीला लागले आहे. गेल्या काही दिवसापासून मनसेमध्ये नाराज असलेले वसंत मोरे(Vasant More) म्हणतात जर ‘पक्षाने मला संधी दिली तर मी निवडणुकीसाठी तयार आहे’ ते आज पुण्यात माध्यमांशी बोलत बोलत होते. (pune loksabha by election if party gives me opportunity i am ready for election said mns leader vasant more)

आतापर्यंत राज्यात बऱ्याच पोटनिवडणूक बिनविरोध झाल्या. परंतु पुण्यातील पोटनिवडणूक बिनविरोध होताना दिसत नाहीत कारण काही दिवसापूर्वी कसबा आणि चिंचवड या विधानसभेच्या पोटनिवडणुका पार पडल्या होत्या. त्यामुळे ही पोटनिवडणूक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जरी लोकसभेला केवळ एक वर्ष शिल्लक असले तरी ही पोटनिवडणूक होऊ शकते. त्यामुळे वसंत मोरे यांचं वक्तव्य महत्वाचं मानलं जात आहे.

विखेंच्या अडचणी वाढल्या : थोरात यांच्या जोडीला आता कोल्हेही मिळाले!

वसंत मोरे म्हणाले…

वसंत मोरे म्हणाले की, ”पक्षानं जर संधी दिली तर मी निवडणुकीसाठी तयार आहे.” ते म्हणाले, ”2017 ची पुणे मनपाची निवडणूक पाहिली तर मध्यमवर्गीय उमेदवार होते, तरीही पुणे शहरातील मतदान पाहता 3 लाख 79 हजार मतं आहेत. पोटनिवडणुकीत कोण मोठा तुल्यबळ नेता धाडस करणार आहे.” ”मनसे कार्यकर्ता जर झाडून कामाला लागला तर चमत्कार घडू शकेल.” ही पोटनिवडणूक लढवण्याची तुमची इच्छा आहे का? असं त्यांना विचारलं असता ते म्हणाले, ”निवडणूक लढवण्यासाठी इच्छा का नसावी? माझं काम चांगलं आहे. राजकारणात असेल तर मोठी स्वप्न पाहिली पाहिजे. वाहतूक, आरोग्य क्षेत्रातील कामं पाहता निवडणूक लागली तर मी राज ठाकरेंशी बोलेन.”

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube