Vasant More Pune : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील मनसे (MNS) नेते वसंत मोरे (vasant More) यांच्या मुलाला धमकीचे मिळाली आहे. त्यानंतर मोरे यांनी पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे याच्या विवाहाचे बनावट सर्टिफिकेट तयार खंडणीची मागणी करण्यात आली आहे. या प्रकारामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे यांच्या नावाने विवाहाचे बनावट सर्टिफिकेट तयार करत खंडणी मागण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. एका महिलेच्या नावाने व्हॉट्सअॅप मेसेज करत 30 लाख रुपयांची खंडणी मागितली आहे. हे पैसे खराडी येथे थांबलेल्या एका कारमध्ये ठेवा असे म्हटले आहे. तसेच विवाहाचे सर्टिफिकेट व्हायरल करण्याची तसेच खंडणी न दिल्यास गोळ्या घालण्याचीही धमकी देण्यात आली आहे. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ तपास सुरू केला आहे.
काही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे (Rupesh More) याच्या वाहनावर धमकीचे पत्र ठेवल्याचे आढळले होते. ‘सावध राहा, रुपेश’ अशा आशयाचे हे पत्र रुपेश यांच्या कारवर ठेवलेले आढळले. त्यामुळेही पुण्यात (Pune) खळबळ उडाली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कात्रज परिसरात भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या नियोजनाचे काम रुपेश मोरे यांच्याकडे होते. रुपेश मोरे याने त्याची कार शाळेच्या मैदानात पार्क केली होती. त्यादरम्यान कोणीतरी त्यांच्या कारच्या वायफरमध्ये सावध राहा, रुपेश अशी चिठ्ठी लिहून ठेवली जी रात्री घरी आल्यावर वसंत मोरे यांनी पाहिली होती.
वाचा : Vasant More यांची पोस्ट व्हायरल! पुण्यात महिलांच्या हाती कोयता?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे हे नेहमीच चर्चेत असतात. करोना काळातही मोरे यांनी चांगले काम केले. सामान्य आणि नडल्या अडल्या लोकांना मदत करणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. सोशल मिडीयावरही त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. मनसे नेते राज ठाकरे यांचे एकनिष्ठ आणि कट्टर मनसैनिक म्हणूनही त्यांची पुण्यात ओळख आहे. अशातच त्यांच्या मुलाला धमकीचे पत्र मिळाल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या संदर्भात त्यांनी फेसबुक पोस्ट लिहीत घटनेची माहितीही दिली होती.
पोटनिवडणुकीवरून वसंत मोरेंनी शिंदे- फडणवीस सरकारला सुनावलं ; तुमचा पराभव निश्चित
यानंतर असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी त्यानुसार तपास सुरू केला आहे. वसंत मोरे यांच्या मुलाला धमकी आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.