पोटनिवडणुकीवरून वसंत मोरेंनी शिंदे- फडणवीस सरकारला सुनावलं ; ‘तुमचा पराभव निश्चित… 

पोटनिवडणुकीवरून वसंत मोरेंनी शिंदे- फडणवीस सरकारला सुनावलं ; ‘तुमचा पराभव निश्चित… 

पुणे : पुण्यातील कसबा आणि चिंचवडच्या (Kasba Chinchwad Elctions) दिवंगत आमदारांच्या निधनानंतर पोटनिवडणूक जाहीर करणाऱ्या शिंदे- फडणवीस सरकारची (Shinde Fadnavis Govt) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी स्पष्ट शब्दात कानउघडणी केली. ‘तुमची मते कमी होतील, म्हणून लगेच त्याठिकाणी निवडणुका घेतल्या, मग मागील एक वर्षापासून शहराला कोणताही लोकप्रतिनिधी (नगरसेवक) नाही. या प्रशासनाने शहराचे वाटोळे लावले आहे. विकास कामे ठप्प झाली असल्याचे म्हणत वसंत मोरे यांनी जोरदार हल्लाबोल केला.

तसेच त्यांनी महापालिका निवडणुका कधी घेणार ? अशी विचारणा केली. त्यासंदर्भात समाजमाध्यमातूनच त्यांनी पोस्ट करत सरकारची पोटनिवडणुकीवरून कानउघडणी केली आहे. माझा शिंदे- फडणवीस सरकारला एक सवाल आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील भाजपाच्या दोन आमदारांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या सरणाची राख अजून निवली सुद्धा नाही, तर तुम्ही तुमची मते कमी होतील म्हणून लगेच त्या- त्या ठिकाणी निवडणुका घेतल्या का ?

गेल्या वर्षापासून आमच्या शहराला कोणताही लोकप्रतिनिधी (नगरसेवक) नाही. प्रशासनाने शहराचे वाटोळे लावून ठेवले आहे. विकास कामे ठप्प झाली आहेत. निधी नसल्याने नागरिकांना चेहरा दाखवावा वाटत नाही. पुण्यातील आमदार खासदारांनी जरा आमच्या चपलेत पाय घालून पहावे आणि हो, जर कोणत्या पक्षाला सहनुभूती मिळेल म्हणून जर निवडणुका टाळत असाल तर तुमचा पराभव निश्चित होणार असे समजा कारण, जो मनातून हरतो तो रणात काय जिंकणार, अशी जोरदार टीका वसंत मोरे यांनी केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube