Download App

आज ‘तुतारी’चं लाँचिंग, त्याआधीच राजेश टोपे-अजितदादांची भेट; दोघांत काय खलबतं?

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर राष्ट्रवादीतील दोन्ही गटांचे मार्ग वेगळे झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला निवडणूक आयोगाने तुतारी चिन्ह दिलं आहे. या चिन्हाचं अनावरण आज रायगड येथे होणार आहे. मात्र, या कार्यक्रमाआधीच पुण्यातील भेटीगाठींनी सकाळीच राजकारणाचा पारा वाढला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यात आहेत. अजित पवार यांच्या उपस्थितीत सर्किट हाऊस येथे विविध बैठका सुरू आहेत. त्याचवेळी शरद पवार गटाचे मोठे नेते राजेश टोपे अजित पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले. दोन्ही नेत्यांत काही काळ बंद दाराआड चर्चाही झाली.

फक्त दोघांतच ही बैठक झाली. अन्य कुणीही उपस्थित नव्हते. या बैठकीनंतर माध्यमांच्या प्रतिनिधींनी राजेश टोपे यांना गाठले. मात्र टोपे यांनी बैठकीत काय चर्चा झाली हे सांगण्यास नकार दिला. यानंतर मात्र राजेश टोपे यांनी मी अजित पवार यांना भेटलोच नसल्याचा खुलासा केला आहे. सर्किट हाऊसवर मी आधीच मुक्कामी होतो असेही टोपे यांनी सांगितले आहे.

Ajit Pawar : ‘दोघंही चांगलं बोलत अन् हसत होते, घडलेली घटना अतिशय’.. अजितदादांची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान, आमदार रोहित पवार आणि खासदार सु्प्रिया सुळे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीसाठी आल्या आहेत. पाण्यासंदर्भात ही बैठक आहे. या बैठकीनंतर अजित पवार, रोहित पवार यांच्यात काही वेगळी चर्चा होते का हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे. अजित पवार, रोहित पवार आणि सुप्रिया सुळे या तिघांची भेट झाली आहे. पाण्याच्या प्रश्नावर तिघांत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या ?

उन्हाळा सुरू होणार आहे. अशातच पिणाच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जनावरांच्या चाऱ्याचीही टंचाई जाणवत आहे. जनावरांसाठी छावण्या सुरु कराव्यात. पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. याची माहिती देण्यासाठी मी येथे आले होते. अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना याबाबत माहिती दिली, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Rohit Pawar : ‘शेतकऱ्यांचा नाही, बड्या व्यापाऱ्यांचाच फायदा’; रोहित पवारांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

रोहित पवार काय म्हणाले?

माझ्या मतदार संघात कुकडीचे पाणी येते. ते १ मार्चपासून सोडावे अशी विनंती अजितदादांना केली. ती त्यांनी मान्य केली आहे. उजनीतील पाणी वापरणाऱ्या शेतकऱ्यांना सहा पट पाणीपट्टी दर केला आहे तो कमी करण्यास अजित पवार यांनी सहमती दर्शवली आहे. राजेश टोपे आले होते याची मला माहिती नाही. माझ्या मतदारसंघातील दुसरे आमदार राम शिंदे यांनी कुकडीतून पाणी सोडण्यास विरोध केला आहे.

follow us