Download App

गिरीश बापट यांच्या जागी कोण ? ; बावनकुळेंनी दिलं ‘हे’ उत्तर

Pune News : पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनामुळे रिक्त झाली आहे. त्यानंतर या मतदारसंघात पोटनिवडणुकीची शक्यता व्यक्त होत असतानाच भाजप (BJP) कुणाला उमेदवारी देणार अशाही चर्चा सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यातील खासदारकी भाजपकडे आहे. गिरीश बापट यांच्याआधी अनिल शिरोळे हे या मतदारसंघाचे खासदार होते. त्यानंतर गिरीश बापटांना संधी मिळाली. त्यामुळे ही जागा आपल्याकडेच रहावी यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

यांनी कायम स्वातंत्र्यावीरांचा अवमान केला, सुजय विखेंनी मविआला सुनावले

पोटनिवडणुकीबाबत अद्याप काही हालचाली नसल्या तरी सहा महिन्यांच्या आत निवडणूक घ्यावीच लागणार आहे. पुण्यात तर अनेकांचे भावी खासदार म्हणून बॅनरही झळकले आहेत. तर काही जण छुपा प्रचार करत असल्याचेही बोलले जात आहे. अशा परिस्थितीत भाजप कुणाला रिंगणात उतरवणार याची चर्चा शहरात सुरू आहे. त्यातच आता प्रदेशाध्यक्ष बावनकुळे शनिवारी पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले, पुणे लोकसभेबाबत सध्या मी कोणतीच चर्चा करणार नाही. तुम्ही सुद्धा अशा काही चर्चा घडवू नका. दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनातून अद्याप त्यांचे कुटुंबिय सावरलेले नाहीत. त्यामुळे निवडणुकीबाबत तुम्ही काहीच चर्चा करू नका. मी सुद्धा अशी कोणतीच चर्चा करणार नाही. असे बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

Kirit Somayya : मढ मालाड येथील बेकायदा स्टुडिओला आदित्य ठाकरेंचा आशिर्वाद

उमेदवारीबाबत त्यांनी कोणतीच माहिती न दिल्याने उमेदवार कोण असणार या प्रश्नाचे उत्तर गुलदस्त्यातच राहिले आहे. या निवडणुकीत उमेदवार कोण असेल अशा चर्चा मात्र सुरू आहेत. बावनकुळे यांनी तुर्तास या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. भाजपने आता जरी नावे उघड केली नसली तरी पक्ष नेतृत्वाला  कधी ना कधी नाव जाहीर करावेच लागणार आहे. त्यामुळे आगामी काळात काय घडामोडी घडतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us