Dilip Walse Patil replies Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यभरात दौरा सुरू केला आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटातील नेत्यांनीही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. मंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही आज अनेक धक्कादायक खुलासे करत शरद पवारांची साथ का सोडावी लागली, याचा खुलासा केला.
दिलीप वळसे पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी वळसेंचा लेखाजोखा ट्विटर मांडून त्यांना प्रश्न विचारला होता. तुमच्यावर तर साहेबांचा सर्वाधिक विश्वास होता. पण, अचानक असं काय संकट आलं की तुम्हाला आपली निष्ठा गहाण ठेवावी लागली. साहेबांनी तु्म्हाला अजून काय द्यायला पाहिजे होतं. असं पवार म्हणाले होते. त्यांच्या या प्रश्नांना आज वळसे पाटील यांनी मंचर येथे आयोजित मेळाव्यात उत्तर दिले.
पोहरादेवीची शपथ घेऊन सांगतो, शहांनी मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता; उद्धव ठाकरे पुन्हा बोलले !
ते म्हणाले, त्यांचं वय 37 वर्षे आहे आणि मी राजकारणात येऊन 40 वर्षे झाली. माझं हे अनुभव पाहता त्यांचं वय लहान आहे. त्यांनी एक पोस्ट टाकली की साहेबांनी तुम्हाला आणखी काय द्यायला हवं. माझी आणि रोहित पवारांची एकदा भेट झाली. तुमच्या मतदारसंघाचा प्रश्न असेल तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो आणि तुम्ही आंबेगाव विधानसभेतून उभे राहा, असं मी त्यांनी सांगितलं होत. माझं भांडण पवार साहेब किंवा त्यांच्या कुटुंबाशी नाही.
मी सत्तेसाठी हपापलेलो नाही. तालुक्यातील जे प्रश्न शिल्लक राहिले आहेत ते सोडवायचे आहेत. आपली लढाई शरद पवार यांच्याबरोबर नाही. त्यांच्यावर कोणताही राग नाही. त्यांनी तालुक्याला भरभरून दिले आहे. कारखाना, बँका, बंधारे हे सर्व पवार साहेबांमुळे झाले माझ्यामुळे नाही असेच मी नेहमी सांगत असतो, असे वळसे पाटील म्हणाले.
मी पुन्हा येईल असं म्हणालो, पण वाटलं नव्हतं इतकी अडचण होईल; फडणवीसांची मिश्कील टोलेबाजी
त्यांनी फक्त दुफळी निर्माण केली
काहींनी निष्ठेचा प्रश्न निर्माण केला. दहा वर्षे कारखान्याचा अध्यक्ष, सात वर्ष बाजार समितीचे सभापती, लोकसभेला तिकीट देऊनही आता वेगळी भूमिका घेतली. त्यांनी नशीब अजमवायला हरकत नाही. पक्षाकडून सत्तेची पदे घेऊन प्रत्येक गावात जाऊन दुफळी गटतट करण्याचे काम त्यांनी केले. अनेक वेळा सांगूनही ऐकले नाही असा टोला वळसे पाटील यांनी देवदत्त निकम यांचे नाव न घेता लगावला.