मी पुन्हा येईल असं म्हणालो, पण वाटलं नव्हतं इतकी अडचण होईल; फडणवीसांची मिश्कील टोलेबाजी

मी पुन्हा येईल असं म्हणालो, पण वाटलं नव्हतं इतकी अडचण होईल; फडणवीसांची मिश्कील टोलेबाजी

Devendra Fadnavis : 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी (Assembly Elections) आपल्या प्रचाराच्या प्रत्येक भाषणात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मी पुन्हा येईलचा नारा दिला होता. मात्र, फडणवीस यांचं सत्तेत येण्याचं स्वप्न भंगलं अन् राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं. त्यानंतर विरोधी पक्ष नेता म्हणून काम करतांनाही त्यांनी विधानसभेत ‘मी पुन्हा येईन’चा वारंवार नारा दिला होता. त्यावरून त्यांची विरोधकांनी चांगलीच खिल्ली उडवली होती. सोशल मीडियावरही त्यांना ट्रोल केलं गेलं. मात्र, गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करत भाजपसोबत युती करून सत्ता स्थापन केली आणि फडणवीस पुन्हा सत्तेत आले ते उपमुख्यमंत्री म्हणून… अशातच आता पुन्हा येईनच्या नाऱ्यावर फडणवीसांनी भाष्य करत विरोधकांवर जोरदार टोलबाजी केली. (Devendra Fadnavis once again said me punha yeil at nagpur)

काल डॉ. उपेंद्र कोठेकर यांच्या दि:कालाच्या मांडवात या काव्यसंग्रहाचे प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपुरात झाले. या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, कविता ही मानवी संवदेना आहेत, त्याचे अर्थ किंवा त्याचा प्रत्यय हा कालाप्रमाणे बदलत असतो. आपण ज्या मानसिकतेत असतो, त्या मानसिकतेत त्या कवितेचा प्रत्यय आपल्याला मिळत असतो. मी देखील विधानसभेत एक कविता म्हटली होती की, मी पुन्हा येईल. पण, तेव्हा वाटलं नव्हतं इतकी अडचण होईल, अशी मिश्कील टिप्पणी फडणवीसांनी केली.

खुशखबर! महावितरणमध्ये या २६ पदांसाठी भरती सुरू, ‘या’ तारखेपर्यंतच करू शकता अर्ज 

ते म्हणाले, मी देखील विधानसभेत पुन्हा येईल ही कविता केली होती. या कवितेनं प्रसिध्दी दिली. पण, तेव्हा वाटलं नव्हतं की, या कवितेमुळं आपली इतकी अडचण होईल. लोकांनी कविता चांगलीच डोक्यावर घेतली होती. केवळ आठ दहा दिवसातं ही कविता दहा भाषांमध्ये अनुवादीत झाली. त्यानंतर आमचं सरकार आलं नाही. तर या कवितेमुळं राज्य हातून गेलं, असं अनेकांनी सांगितलं.

शेवटी मला हे सांगाव लागलं की, मी जे पुन्हा येईल असं म्हणालो होतो. ते मी पण आलो आणि इतरांनाही सोबत घेऊन आला. परवा अजून एकाला बरोबर घेतलं आहे. त्यामुळं वेगवेगळ्या परिस्थिती कविता प्रत्यय देत असते, असं फडणवीस यांनी म्हटलं. यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवर, उर्मिला आपटे, श्याम धोंड यांच्यासह अनेक खासदार-आमदार उपस्थित होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube