Download App

Pune News : आज बिबवेवाडीत ‘श्री उवसग्गहरं स्तोत्र’ सामूहिक पठण

आज सायंकाळी पुणे शहरातील बिबवेवाडी येथे श्री उवसग्गहरं स्तोत्र पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Pune News : आर.एम.धारिवाल फाउंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल बालन व उपाध्यक्षा शोभा रसिकलालजी धारीवाल यांच्यावतीने श्री उवसग्गहरं स्तोत्र पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी आचार्य पद्मश्री चंदनाजी म.सा. आणि पू . श्री सुप्रियदर्शनजी म.सा. आदीठाणा-५ उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम पुणे शहरातील (Pune News) बिबवेवाडी येथील श्रीमान रसिकलालजी धारिवाल स्थानक भवन यश लॉन्स येथे आज (रविवार) सायंकाळी 4 ते 5 यावेळेत होणार आहे.

गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांसाठी पुनीत बालन यांची मोठी घोषणा; उद्योग व्यवसायासाठी करणार मदत

जैन धर्मियांमध्ये महामंगलकारी समजल्या जाणाऱ्या श्री उवसग्गहरं स्तोत्राच्या पठणाचा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करण्यात येतो. यंदा स्तोत्र पठणाचे आठवे वर्ष आहे. प्रथम कार्यक्रम २०१७ मध्ये रसिकलालजी धारिवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि संत व साध्वी म.सा. यांच्या सानिध्यात संपन्न झाला होता. “श्री उवसग्गहरं स्तोत्राच्या नियमित स्मरणामुळे सांसारिक दुःख दूर होतात तसेच मानवी जीवनात सुख समृद्धी येते अशी धारणा आहे.

कार्यक्रम वेळेवर सुरू होईल. नियोजित वेळेत सर्वांनी सहपरिवार या महामंगलकारी स्तोत्रात सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. सहभागी होणाऱ्या पुरुषांनी शुभ्र तर महिलांनी केशरी वस्त्र परिधान करणे अनिवार्य आहे, अशी माहिती फाऊंडेशनच्या शोभा धारिवाल यांनी दिली.

Punit Balan : शिवमुद्रा ढोल ताशा पथक वाद्य पूजन सोहळा आणि सराव शुभारंभ

follow us