Download App

रुपाली ठोंबरे अडचणीत; मतदान करतानाचा ईव्हीएमचा फोटो केला व्हायरल

Kasba Chinchwad Bypoll : कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचे मतदान करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्या रुपाली ठोंबरे (Rupali Thombare) यांनी थेट ईव्हीएम मशीनचा फोटो काढून सोशल मिडियावर (Social Media) व्हायरल केला. या प्रकारामुळे त्या आता अडचणीत सापडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. रुपाली ठोंबरे यांनी गोपनीयतेचा भंग केला आहे. निवडणूक आयोग (Election Commission) या प्रकरणाची दखल घेईल का, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे.

Kasba Chinchwad Bypoll : आमदार तांबे म्हणाले, निवडणुकीचा ‘तसा’ परिणाम होणार नाही

पुण्यातील कसबा (kasba Peth) आणि पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad) निवडणुकीसाठी आज (रविवार) सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत 10.45 टक्के मतदान झाले आहे. मतदार सकाळपासूनच मतदान केंद्रांवर हजर होत मतदान करत आहेत. या मतदानत प्रक्रियेत कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी मतदान केंद्रांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

वाचा :  Kasba Chinchwad Bypoll : संजय राऊतांनी व्यक्त केली वेगळीच भीती; म्हणाले, हा तर त्यांचा प्रशासनावर..

कसबा पेठ पोटनिवडणुकीत काँग्रेसेचे उमेदवारज रवींद्र धंगेकर, भाजपचे हेमंत रासने आणि हिंदू महासंघाचे आनंद दवे रिंगणात आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपकडून अश्विनी जगताप, राष्ट्रवादीकडून नाना काटे तर राहुल कलाटे अपक्ष म्हणून निवडणूक लढत आहेत. दरम्यान,ठोंबरे यांनीही मतदानाचा हक्क बजावला.मात्र यावेळी त्यांनी ईव्हीएमसह फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. या प्रकाराने विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आता या प्रकाराची निवडणूक आयोग दखल घेणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.निवडणूक आयोग काय कारवाई करणार हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us