Download App

पुण्यात शिक्षिकेची विद्यार्थ्याला मारहाण, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पालकांची पोलिसांत तक्रार

Pune News : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका शिक्षिका विद्यार्थ्याला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर झाला आहे. हा मारहाणीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. मारहाणीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर संबंधित विद्यार्थ्याच्या पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे. तसेच या विद्यार्थ्याच्या पालकांनी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षांना निवेदन देत या शिक्षिकेविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Pune News : निवडणुकीआधीच बोनस! ‘त्या’ 34 गावांच्या समितीत महायुतीच्या कार्यकर्त्यांना संधी

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थी घोळका करून बसले होते. वर्गात दंगाही करत होते. हा प्रकार पाहून शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आली. हा प्रकार पुण्यातील एका शाळेत घडला. याबाबत विद्यार्थ्यांच्या पालकांनी विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. सदर प्रकार हा विद्यार्थ्यांनी मोबाईलमध्ये मारहाण करताना कैद केला.

हा व्हिडिओ विद्यार्थ्यांच्या पालकांनी पाहिल्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलिसात शिक्षकेविरुद्ध तक्रार दाखल केली. मुलाला बेदम मारहाण करण्याचा प्रकार गंभीर आहे. त्याबाबत संस्थेने त्यांना बडतर्फ करावे. यापूर्वी देखील या शिक्षिकेने बऱ्याच मुलांना बेदम मारहाण केली आहे अशी माहिती समोर आल्याचं पालकांना समजलं आहे. सदर पालकाने विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये शिक्षकेविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

Pune Loksabha : माझा विश्वास मतांच्या विभाजनावर नाही तर पुणेकरांवर.. धंगेकरांना भलताच कॉन्फिडन्स

ही मारहाण मार्च महिन्यात झाली होती. परंतु, हा व्हिडिओ आता व्हायरल झाला. नंतर हा व्हिडिओ विद्यार्थ्याच्या वडिलांच्या पाहण्यात आली. त्यांनी तत्काळ पोलीस ठाणे गाठत या शिक्षिकेविरुद्ध तक्रार दाखल केली. या प्रकाराने पुण्यात खळबळ उडाली आहे. शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याऐवजी आता मारहाणीचे प्रकार घडू लागले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांत भीती निर्माण झाली आहे. या प्रकाराने एकूणच शिक्षण क्षेत्राचे वास्तव पुन्हा एकदा समोर आणले आहे.

 

follow us