‘मावळ’ ताब्यात घेण्यासाठी भाजपनं शिलेदार हेरला; बुट्टे पाटलांना जिल्हाध्यक्षपदाची लॉटरी

Pune News : लोकसभा आणि त्यापाठोपाठ येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांची जोरदार तयारी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. निवडणुकांच्या मोर्चेबांधणीत भाजपने आघाडी घेतली असून पुन्हा एक मोठा डाव टाकला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संघटनात्मक जिल्हाध्यक्षांच्या नवीन टीमची घोषणा केली आहे. बावनकुळे यांनी जवळपास 70 नावांची घोषणा केली आहे. यामध्ये पुणे मावळ विभागाच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी माजी […]

Sharad Butte

Sharad Butte

Pune News : लोकसभा आणि त्यापाठोपाठ येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांची जोरदार तयारी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. निवडणुकांच्या मोर्चेबांधणीत भाजपने आघाडी घेतली असून पुन्हा एक मोठा डाव टाकला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संघटनात्मक जिल्हाध्यक्षांच्या नवीन टीमची घोषणा केली आहे. बावनकुळे यांनी जवळपास 70 नावांची घोषणा केली आहे. यामध्ये पुणे मावळ विभागाच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांच्यावर सोपविली आहे.

ग्रामीण भागात चांगली पकड असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटलांवर भाजप पुणे (मावळ विभाग) जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टाकली आहे. यामुळे खेड तालुक्यासह मावळ परिसरात बुट्टे पाटील समर्थकांनी जल्लोष केला.

सोमय्यांच्या कथित व्हिडिओ प्रकरणात आता महिला आयोगाची एंट्री, थेट पोलिसांना पत्र

बुट्टे पाटील यांनी पुणे जिल्हा नियोजन उपसमितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले असून खेड तालुक्यातील पिंपरी पाईत या जिल्हा परिषद गटातून आतापर्यंत 2002, 2007 आणि 2017 ला ते तीन वेळा पुणे जिल्हा परिषदेवर निवडून आले आहेत. शिवाय त्यांची ग्रामीण भागात मोठी पकड असून मोठं संघटन कौशल्य हेरून भाजप श्रेष्ठींनी त्यांच्यावर पुणे जिल्ह्यातील मावळ विभागाची जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे.

दरम्यान, बुट्टे पाटील यांनी गटनेता तथा कृषी व पशुसंवर्धन सभापती म्हणून चोख जबाबदारी पार पाडत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर छाप सोडली होती. याचीच बक्षिशी म्हणून बुट्टे पाटलांच्या गळ्यात पुणे जिल्हाध्यक्ष पदाची माळ पडल्याचे बोलले जात आहे. शिवाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच मावळ विधानसभेवर आपली पुन्हा पकड मजबूत करण्यासाठी त्यांची नियुक्ती केल्याचं बोललं जात आहे.

‘ना में बुरा देखता हूँ’; गांधीजींचा भक्त आहे म्हणत राऊतांचा सोमय्यांना टोला

नगरमध्ये जुन्या नेत्यांवर विश्वास 

यामध्ये पुणे शहर- धीरज घाटे, पुणे ग्रामीण (बारामती) – वासुदेव काळे, पुणे (मावळ) – शरद बुट्टे पाटील यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. अहमदनगर शहराध्यक्षपदी अॅड. अभय आगरकर, अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्षपदासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील तर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी दिलीप भालसिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Exit mobile version