विष्णू सानप
Sushma Andhare : गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) या भाजपवर नाराज असून त्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील, अशा चर्चा सुरू आहेत. त्यांनी नुकतेच दिल्ली येथे ‘रासप’च्या कार्यक्रमात “मी भाजपची आहे पण भाजप माझा थोडीच आहे”, असं विधान केलं आणि या चर्चांना अधिकच हवा मिळाली. त्यातच आज (3 जून) गोपीनाथ गडावर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची भेट होत आहे. यामुळे त्या आज गोपीनाथ गडावर काही वेगळा निर्णय तर घेणार नाहीत ना?, अशाही चर्चा रंगत आहे.
‘त्यांच्या बोलण्यानं आमच्या अंगाला भोकं पडत नाहीत’; अजितदादांचा राऊतांवर पलटवार
दरम्यान, पंकजा मुंडे भाजप सोडणार या चर्चा सुरू झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षातून प्रतिक्रिया येत आहेत. यावर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आता शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. अंधारे यांनी आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
अंधारे म्हणाल्या, पंकजा मुंडे या भाजप सोडतील असं मला वाटतं नाही. तसेच, एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांच्या आजच्या भेटीवर बोलताना त्या पुढे म्हणाल्या, एकनाथ खडसे आणि गोपीनाथ मुंडे यांचे फार घनिष्ठ संबंध राहिलेले आहेत. मागच्या वर्षी एकनाथ खडसे हे भाजपमधून बाहेर पडण्याच्या तयारीत असताना देखील गोपीनाथ गडावर गेले होते. गोपीनाथ मुंडे हे पक्षाच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या राजकारणातील आणि ओबीसी चळवळीतील एक प्रमुख चेहरा तसेच महत्त्वाचा लोकनेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे मुंडे साहेबांच्या अनुषंगाने ही भेट होत असेल आणि तिथे काही चर्चा होत असतील तर त्याला राजकीय रंग देणे योग्य नाही असं अंधारे म्हणाल्या.
राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार? शरद पवारांच्या शिलेदारासाठी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची फिल्डिंग
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर सातत्याने नितेश राणे यांच्याकडून टीका केली जाते. यावर बोलताना नितेश राणे हे लहान आहेत त्यांच्या चूका आपण पोटात घालू, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावलाय.