Download App

दहावी- बारावी परीक्षेच्या निकालाबद्दल मोठी अपडेट; ‘या’ महिन्यात जाहीर होणार निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळतर्फे घेण्यात आलेल्या दहावी बारावीच्या 21 लाख विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर

  • Written By: Last Updated:

SSC HSC Result : राज्यात सध्या दहावी- बारावीच्या परीक्षा संपून आता मोठा झालाय. (Result) दरम्यान दहावी, बारावी परीक्षानंतर विद्यार्थी, पालकांकडून पुढील शिक्षणाची चर्चा आहे. मात्र, निकाल कधी लागणार? याचे पालकांना वेध लागले आहेत. दहावी, बारावीच्या निकालासंदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संभाव्य ॲक्शनची चर्चा; पाकिस्तानमधील या दहशतवादी शाळा अ‍ॅक्टिव

बारावीच्या विद्यार्थ्यांची 11 फेब्रुवारीपासून तर दहावीच्या विद्यार्थ्यांची 21 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरू झाली होती. दरम्यान दहावी, बारावी निकालासाठी विद्यार्थी, पालकांना जास्त दिवस वाट पाहावी लागणार नाही. कारण दहावी, बारावी परीक्षांचे निकाल मे मध्येच जाहीर केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळांकडून तपासलेल्या उत्तरपत्रिकांचा आढावा अधिकारी दररोज घेत आहेत.

21 लाख विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळतर्फे घेण्यात आलेल्या दहावी बारावीच्या 21 लाख विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार आहेत. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा, तर दुसर्‍या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. याबाबत लवकरच तारीख जाहीर केल्या जातील असेही बोर्डाकडून सांगण्यात आले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने ही माहिती दिली.

follow us

संबंधित बातम्या