Krishna Prakash : ज्येष्ठ पोलिस अधिकारी ‘आयर्नमॅन’ म्हणून ओळखले जाणारे कृष्ण प्रकाश (Krishna Prakash) यांना महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीने “ट्रस्टवर्दी” 2023 (Trustworthy 2023) या काव्यसंग्रहासाठी सुवर्णपदक जाहीर करण्यात आले आहे. याबाबत कृष्ण प्रकाश यांनी माहिती देत सर्वांचे आभार मानले आहे. “ट्रस्टवर्दी” 2023 या काव्यसंग्रहात कृष्ण प्रकाश यांनी देशभक्तीवर लिहिले आहे.
याबाबत माहिती देताना कृष्ण प्रकाश म्हणाले की, तुमच्या शुभेच्छांसाठी मी तुमचा खूप आभारी आहे. महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीने दिलेल्या पुरस्कारांमध्ये माझ्या “ट्रस्टवर्दी” या काव्यसंग्रहासाठी 2023 मध्ये देशभक्तीवर लेखन केल्याबद्दल मला सुवर्णपदक देण्यात येत आहे, ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. हा पुरस्कार केवळ माझ्या साहित्यिक प्रतिभेचा पुरावा नाही तर तुम्हा सर्व हितचिंतकांच्या शुभेच्छा आणि देवाच्या असीम कृपेचे जिवंत उदाहरण आहे.असं कृष्ण प्रकाश म्हणाले.
हिंदी साहित्याचा हा अनोखा महोत्सव 18 मार्च 2025 (मंगळवार) रोजी संध्याकाळी 6.30 वाजता आयोजित करण्यात येणार आहे. हा भव्य कार्यक्रम रंगशारदा सभागृह, लीलावती रुग्णालयाजवळ, वांद्रे (पश्चिम), मुंबई येथे होणार आहे.
महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी गेल्या अनेक वर्षांपासून हिंदी साहित्याच्या प्रचार आणि सन्मानात अग्रेसर आहे. हा पुरस्कार साहित्यिक साधकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि हिंदी भाषेच्या विकासात योगदान देण्यासाठी एक महत्त्वाचे माध्यम आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारतीय संघात ‘राडा’, कोच गंभीर इंग्लंडला जाणार नाही, कारण काय?
तर दुसरीकडे महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीने त्यांच्या प्रतिष्ठित “काका कालेलकर चरित्र साहित्य पुरस्कार – सुवर्ण” साठी डॉ. राजेंद्र प्रताप सिंह यांची निवड केली आहे. हा पुरस्कार त्यांच्या “श्री ओम साई राम” या प्रशंसनीय कार्यासाठी दिला जात आहे.