Download App

आरपीआय मैदानात! बारा जागांची मागणी करत आठवलेंची इलेक्शन फिल्डिंग

आगामी विधानसभा निवडणुकीत आरपीआयला किमान दहा ते बारा जागा मिळाल्या पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

Maharashtra Elections 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Elections 2024) वारे वाहू लागले आहेत. निवडणुका तोंडावर आल्याने राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून चाचपणी केली जात आहे. तर दुसरीकडे दबावाचं राजकारणही सुरू झालं आहे. कुणाला किती जागा मिळणार याबाबत अजून काहीच निश्चित नाही मात्र त्याआधीच दोन्ही आघाडींतील मित्रपक्षांकडून जागांची मागणी सुरू झाली आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) आज पुण्यात आले (Pune News) होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आगामी विधानसभा निवडणुकीत आरपीआयला किमान दहा ते बारा जागा मिळाल्या पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

रामदास आठवलेंचं प्राणीप्रेम! म्हणाले, दलित पॅंथरमधून आल्याने बिबट्याचं खास 

मंत्री आठवले पुढे म्हणाले, माझ्या पक्षाचा एकही खासदार नसताना मोदींनी माझ्यावर तिसऱ्यांदा मंत्रिपदाची जबाबदारी सोपवली त्याबद्दल त्यांचे आभार. रिपब्लिकन पक्ष जरी छोटा असला तरी तो इतर पक्षांना मोठा करणारा पक्ष आहे. आमचे सरकार पूर्ण पाच वर्षे पूर्ण करणार असून 2029 लाही पुन्हा एनडीएचं सरकार येणार याची आम्हाला खात्री आहे. एकट्या मोदींना हरवण्यासाठी सर्व नेते एकत्र आले तरीसुद्धा ते मोदींना हरवू शकले नाहीत. या निवडणुकीत भाजपला ज्या 240 जागा मिळाल्या आहेत काँग्रेसला जेवढ्या जागा तीन वेळच्या निवडणुकीत मिळाल्या त्यापेक्षाही जास्त आहेत.

मनमोहन सिंह यांच्या काळात 200 पेक्षा कमी जागा असतानाही काँग्रेसने (Congress Party) दहा वर्षे सरकार चालवलं. काही जण फुटतील अशा अफवा पसरवल्या जात आहेत पण तसे काही होणार नाही. आमचं सरकार पाच वर्षे टिकेल असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.

लोकसभेत आरपीआयला (Lok Sabha Election) दोन जागा मिळाव्यात अशी अपेक्षा होती, पण एकही जागा मिळाली मिळाली नाही. तरी नाराजी बाजूला ठेवून आम्ही कामाला लागलोय. विधानपरिषद निवडणुकीत एक जागा मिळावी अशी मागणी केली होती पण मिळाली नाही. आता एक मंत्रिपद मिळावं अशी आमची मागणी आहे. आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये मी चाळीस-पन्नास जागा मागणार नाही पण आरपीआयला 10 ते 12 तरी जागा मिळाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Ramdas Athawale : राजकारणात काहीही होऊ शकतं, अजित पवार रिपाईंत आले तर त्यांना मुख्यमंत्रीपद देऊ

देशभरात सध्या चर्चेत असलेल्या ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणावर मंत्री आठवले यांनी भाष्य केले. पूजा खेडकर यांनी (Pooja Khedkar) जर चुकीची माहिती देऊन आरक्षणाचा फायदा घेतला असेल तर ते अत्यंत गैर आहे. याची चौकशी झाली पाहिजे. यामध्ये त्या दोषी आढळल्या तर त्यांना त्या पदावरून हटवलं पाहिजे असे आठवले यावेळी म्हणाले.

follow us