Video : हाताने कॅमेरा हटवला, आतमध्ये टाकण्याची धमकीही; IAS पूजाच्या आईचं रौद्ररुप

Video : हाताने कॅमेरा हटवला, आतमध्ये टाकण्याची धमकीही; IAS पूजाच्या आईचं रौद्ररुप

IAS Pooja Khedkar : आयएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) यांच्या खाजगी ऑडी कारवर लाल दिवा लावल्याप्रकरणी पुणे पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची चर्चा होती. अखेर पोलिस त्यांच्या निवासस्थानी पोहोचले असता गेटवरच पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर (Manorma Khedkar) यांनी माध्यमांचा कॅमेरा हटवत सगळ्यांना आतमध्ये टाकणार असल्याची धमकी दिलीयं. खेडकर यांच्या ऑडी कारच्या चौकशीसाठी पोलिस त्यांच्या निवासस्थानी गेले होते. मात्र, पोलिसांनी मनोरमा खेडकर यांनी गेटच्या आत येऊ दिलं नसल्याचं समोर आलंय.

पुणे पोलिसांकडून ऑडी कारवर एमव्ही कायद्यांतर्गत कारवाई होणार असल्याची माहिती समोर येताच पोलिस ऑडी कारच्या चौकशीसाठी पूजा खेडकर यांच्या निवासस्थानी गेले होते. यावेळी पोलिसांनी अनेकदा गेटची बेल वाजवूनही निवासस्थानातून कोणीही प्रतिसाद दिला नाही. बराच काळाच्या प्रतिक्षेनंतर पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर गेटजवळ येत मी सगळ्यांना आत टाकणार, या शब्दांत पोलिसांवर दमदाटी केल्याचं दिसून आलं.

पूजा खेडकरच्या आईने रौद्ररुप धारण केल्यानंतर पोलिसांना कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. पोलिसांना निवासस्थानाबाहेर गेटच्या आत लावलेल्या ऑडी कारची आणि लाल दिव्याबाबतची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, पोलिसांच्या तपासात मनोरमा खेडकर यांनी कोणत्याही प्रकारचं सहकार्य न केल्याने पोलिस प्रशासनाकडून पुढील कोणती अॅक्शन घेतली जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

IAS पूजा खेडकर : अपंग अन् नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट मिळालंच कसं? सामाजिक कार्यकर्त्याची चौकशीची मागणी

दरम्यान, पुण्यातून वाशिम जिल्ह्यात बदली झाल्यानंतर पूजा खेडकर यांच्याबाबतची धक्कादायक माहिती समोर येत आहे. पूजा यांचं अपंग आणि नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट आणि कोट्यावधींच्या संपत्तीची माहिती समोर येत असून त्यांच्याकडे एवढी मोठी संपत्ती कुठून आलीयं, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. पुण्यात परिविक्षाधीन असताना पूजा खेडकर यांनी आपल्या खाजगी ऑडी कारवर लाल दिवा लावला होता. यासोबतच चेंबरवरही डल्ला मारल्याप्रकरणी त्या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या.

खेडकर यांच्या बदलीनंतर त्यांच्यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. आपल्याला दृष्टीहीन असल्याचा अपंगत्वाचा दाखल देत पूजा खेडकर या युपीएससी परिक्षा उत्तीर्ण झाल्या. यासोबतच वडीलांकडे एकराने शेती असूनही नॉन क्रिमीलेअर दाखल त्यांनी सादर केला होता. त्यामुळे खेडकरांना अपंग आणि नॉन क्रिमीलेअर दाखले मिळालेच कसे? असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला होता. यासोबतच कुंभार यांनी पूजा खेडकर यांच्या संपत्तीबाबतची पोस्ट एक्सवर शेअर केलीयं. यामध्ये पूजा यांच्याकडे तब्बल 17 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचा दावा कुंभार यांनी केलायं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज