IAS पूजा खेडकरबद्दल आणखी एक धक्का! 17 लाखांचं घड्याळ, 6 दुकाने, 7 फ्लॅट अन्…

IAS पूजा खेडकरबद्दल आणखी एक धक्का! 17 लाखांचं घड्याळ, 6 दुकाने, 7 फ्लॅट अन्…

IAS Pooja Khedkar : लाल दिवा आणि चेंबरवर डल्ला मारणाऱ्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्याबाबत नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. पूजा खेडकर यांचं अपंग आणि नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र प्रकरण समोर आल्यानंतर आता त्यांच्या संपत्तीबाबतची माहितीही समोर आलीयं. पूजा खेडकर यांच्याकडे बेहिशोब तब्बल 17 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचा दावा माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलायं. त्यामुळे आता पूजा खेडकरचा पाय आणखीनच खोलात जाणार असल्याचं बोललं जात आहे.

श्रीमंताचा दिखावा पडणार महागात, IAS पूजा खेडकरांच्या अडचणीत वाढ, पुणे पोलीस करणार कारवाई

पूजा खेडकर यांच्या आई-वडीलांकडे नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र असून त्यांच्याकडे 110 एकर शेतजमीनही आहे. तसेच खुद्द पूजाकडे 1.6 लाख चौरस फुटाची 6 दुकाने, पुण्यातील उच्चभ्रू वस्तीत 7 फ्लॅट आहेत. सोबतच 900 ग्रॅम सोने, हिरे, 17 लाखांचं घड्याळ, 4 चारचाकी, खाजगी कंपन्यांमध्ये भागीदारीसह एक ऑटोमोबाईल कंपनी असल्याचा दावा विजय कुंभार यांनी केलायं. कुंभार यांनी यासंदर्भातील पोस्ट एक्सवर पोस्ट केली असून पूजा खेडकर यांच्या 17 कोटींच्या संपत्तीची चौकशी व्हायला नको? असा सवालही कुंभार यांनी केलायं.

अन् बॅडमिंटन कोर्टवर उतरल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पाहा खास फोटो

ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची वाशिम जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे. खासगी गाडीवर लाल दिवा आणि चेंबरवर डल्ला मारणाऱ्या या अधिकारी चांगल्याचं चर्चेत आल्या होत्या. अखेर, सरकारने निर्णय घेतला असून त्यांची आता वाशिमला उचलबांगडी करण्यात आली आहे. आणि वरिष्ठ अधिकाऱ्याचे अँटी चेंबर बळकावल्यापासून ते खासगी गाडीवर अंबर दिवा आणि महाराष्ट्र शासन लिहिलं या प्रकारचे त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते. पूजा खेडकर पुणे जिल्ह्यात परिविक्षाधिन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रूजू झाल्या होत्या. दरम्यान, त्यांनी केलेले कारनामे पाहाता आता त्यांना वाशिमचा रस्ता दाखवण्यात आलायं.

दरम्यान, वादग्रस्त अपगंत्व प्रमाणपत्र देऊन IAS ची पोस्ट मिळवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. शिवाय वडिलांची 40 कोटींची संपत्ती असूनही त्यांनी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र जोडल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. तब्बल सहावेळा पूजा खेडकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वैद्यकीय चाचणीला उपस्थित राहण्याचे टाळले. तसेच नुकतीच बदली झालेल्या वाशिमला देखील त्या रूजू झालेल्या नाहीत. खेडकर हे व असे अनेक कारनामे समोर येत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube