चमकोगिरीचा हव्यास नडला; पुण्यातील अधिकारी पूजा खेडकरांची थेट वाशिमला बदली

चमकोगिरीचा हव्यास नडला; पुण्यातील अधिकारी पूजा खेडकरांची थेट वाशिमला बदली

Pooja Khedkar : ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची वाशिम जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे. खासगी गाडीवर लाल दिवा आणि चेंबरवर डल्ला मारणाऱ्या या अधिकारी चांगल्याचं चर्चेत आल्या होत्या. अखेर, सरकारने निर्णय घेतला असून त्यांची आता वाशिमला उचलबांगडी करण्यात आली आहे. आणि वरिष्ठ अधिकाऱ्याचे अँटी चेंबर बळकावल्यापासून ते खासगी गाडीवर अंबर दिवा आणि महाराष्ट्र शासन लिहिलं या प्रकारचे त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते. (Pooja Khedkar) पूजा खेडकर पुणे जिल्ह्यात परिविक्षाधिन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रूजू झाल्या होत्या. दरम्यान, त्यांनी केलेले कारनामे पाहाता आता त्यांना वाशिमचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज