Download App

मोठी बातमी! कमल व्यवहारे संभाजीराजेंच्या भेटीला, कसब्यात बंडखोरी होणार?

कॉंग्रेस नेत्या आणि माजी महापौर कमल व्यवहारे (Kamal Vyawhare) यांनी स्वराज्य पक्षाचे नेते संभाजीराजे छत्रपतींची भेट घेतली आहे.

  • Written By: Last Updated:

Kamal Vyawhare Met Sambhajiraje chhatrapati : विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election) तारीख जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला. आता कॉंग्रेस नेत्या आणि माजी महापौर कमल व्यवहारे (Kamal Vyawhare) यांनी स्वराज्य पक्षाचे नेते संभाजीराजे छत्रपतींची (Sambhajiraje chhatrapati) भेट घेतली. कमल व्यवहारे या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असून त्यांनी संभाजीराजेंची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं.

मोहितेंसमोर नवी अडचण; चुकीचा उमेदवार दिला तर ‘तिसरा’ पर्याय देणार? खेडमध्ये सर्वपक्षीय नेते एकत्र 

शहरात कॉंग्रेसचे वर्चस्व असतांना कसबा पेठ मतदारसंघ हा गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला राहिला. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळवत हा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला. आताही कसबा मतदारसंघात काँग्रेस धंगेकरांनाच पुन्हा एकदा संधी देणार असल्याची चर्चा आहे. मात्र, असं असलं तरी खरे या मतदारसंघाचे कमल व्यवहारे, मुख्तार शेख, बाळासाहेब दाभेकर, संगीता तिवारी, गोपाल तिवारी हेही इच्छुक आहेत.

डॉक्टरांकडून आरामाचा सल्ला पण, गद्दारांना गाडण्यासाठी मैदानात; अँजिओप्लास्टिनंतर ठाकरे कडाडले 

दरम्यान, कमल व्यवहारे यांनी संभाजीराजेंची भेट घेतली. या भेटीबाबत बोलतांना व्यवहारे म्हणाल्या की, संभाजीराजे छत्रपती यांचे वडील आमच्या पक्षाचे खासदार आहेत. तर संभाजीराजे आणि आम्ही एकाच संस्थेत काम करतो. त्यासंदर्भात ही भेट होती. ही राजकीय भेट नव्हती, असं त्यांनी स्पष्ट केलं.

आपण पक्षात जाणार का? याविषयी विचारलं असता त्या म्हणाल्या की, मी निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. पण कोणत्याच पक्षात जाणार नाही. गेल्या 40 वर्षांपासून मी काँग्रेसची सदस्य आहे, असं सांगत यंदा परिवर्तन करणार आणि निवडणूक लढवणारच, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

कमल व्यवहारे यांनी कसबा लढवण्याची इच्छा व्यक्त केली. कॉंग्रेसकडून तिकीट मिळण्याची शक्यता कमी असल्याने त्यांनी संभाजीराजेंचीही भेट घेतली. त्यामुळे रवींद्र धंगेकरांसह काँग्रेसच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली.

दरम्यान, व्यवहारे या काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या असून त्या पुण्याच्या पहिल्या महिला महापौर होत्या. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात कमल व्यवहारे यांचं चांगलं संघटन मजबूत आहे. त्या अपक्ष किंवा तिसऱ्या आघाडीकडून निवडणुकीला उभ्या राहिल्यास याचा सर्वात मोठा फटका कॉंग्रेसला बसणार आहे. त्यामुळं कसब्यामध्ये कॉंग्रेस कोणाला रिंगणात उतरवणार? हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us