Malegaon Cooperative Sugar Factory : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या (Malegaon Cooperative Sugar Factory) चुरशीच्या निवडणुकीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या कारखान्यावर एकहाती वर्चस्व मिळवण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली. दोन जागा वगळता इतर कोणत्याही जागेवर त्यांच्या पॅनलसमोर विरोधी उमेदवार टिकू शकले नाहीत ऊस उत्पादक मतदारसंघाच्या माळेगाव गटातील रंजन तावरे यांना धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला.
कॅबिनेटमध्येच निर्णयाला विरोध करायला हवा होता; आव्हाडांचा अजितदादांना खोचक सल्ला…
माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणीला काल सुरूवात झाली होती. मंगळवारी सकाळी सुरू झालेली मतमोजणी बुधवारी दुपारनंतरही सुरूच होती. दुपारी २ वाजेपर्यंत जाहीर झालेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सर्व जागांवर अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनलच्या उमेदवारांनी विजय मिळवला. फक्त दोन जागांवर सहकार बचाव पॅनेलकडून अजितदादांच्या पॅनलला टक्कर मिळतेय. त्यामुळे अजित पवारांचे पॅनल १९ ते २० जागा जिंकेल असा अंदाज आहे.
दरम्यान, पॅनलचा विजय निश्चित झाल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रशासकीय इमारतीसमोर फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. या कारखान्याच्या भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास मतदारसंघातून नीलकंठेश्वर पॅनलचे विलास ऋषिकांत देवकाते हे २१९४ मतांनी विजयी झाले. देवकाते यांना ८९७२ मते मिळाली तर विरोधी सहकारी बचाव पॅनलचे सूर्यजी देवकाते यांना ६५९८ मते मिळाली. ब वर्गातून उपमुख्यमंत्री अजित पवार ८१ मतांनी विजयी झाले. त्यांना ९१ मते मिळाली तर विरोधी भालचंद्र देवकाते यांना १० मते मिळाली.
पुणे मेट्रो लाईन 2 साठी 3626 कोटी रुपये मंजूर; मोदी सरकारचे पुणेकरांना गिफ्ट
इतर मागासप्रवर्गातून नीलकंठेश्वर पॅनलचे नितीन वामनराव शेंडे ११५३ मतांनी विजयी झाले. तर सहकार बचाव पॅनलचे रामचंद्र नाळे यांना ७३४१ मते मिळाली. अनुसूचित जाती/जमाती मतदारसंघातून नीलकंठेश्वर पॅनलचे रतनकुमार भोसले १४८७ मतांनी विजयी झाले. त्यांनी सहकार बचाव पॅनलचे बापूराव गायकवाड यांचा पराभव केला. भोसले यांना ८६७० मते मिळाली तर गायकवाड यांना ७१८३ मते मिळाली.
महिला राखीव प्रवर्गातून नीलकंठेश्वर पॅनलच्या संगीता कोकरे व ज्योती मुलमुले यांनी सहकार बचाव पॅनलच्या राजश्री कोकरे व सुमन गावडे यांचा पराभव केला. संगीता कोकरे यांना ८४४०, ज्योती मुलमुले यांना ७५७६ मते तर राजश्री कोकरे यांना ७४८५ आणि सुमन गावडे यांना ६०९९ मते मिळाली.
ऊस उत्पादक मतदारसंघाच्या माळेगाव गटात धक्कादायक निकाल पाहायला मिळाला. पारंपारिकदृष्ट्या हा गट तावरे यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, या गटातून तीनही उमेदवार अजित पवार गटाचे निवडून आले आहेत. या गटातून कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा विरोधकांचे नेते रंजन तावरे यांचा पराभव झाला. हा पराभव तावरे कंपनीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
माळेगाव गटातून नीलकंठेश्वर पॅनलचे शिवराज जाधवराव यांना ८६१२, बाळासाहेब तावरे यांना ७९४६ आणि राजेंद्र बुरुंगले यांना ८११६ मते मिळाली. रंजन तावरे यांना ७३५३, संग्राम काटे यांना ६७०१ आणि रमेश गोफणे यांना ६३०२ मते मिळाली. यावेळी रंजन तावरे यांना पराभवाचा सामना करावा लागला. दुपारी २ वाजेपर्यंत एक-दोन जागा वगळता अजितदादांच्या नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार आघाडीवर होते.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माझ्याकडे पाहून तुम्ही मदतान करा, राज्यातील पहिल्या पाच कारखान्यांमधील भाव तुम्हाला देतो, असा शब्द दिला होता. तसेच पाच वर्षे मीच कारखान्याचा अध्यक्ष राहीन, असंही म्हटलं होतं. त्यांच्या या आवाहनाला सभासदांनी भरभरून साथ देत नीलकंठेश्वर पॅनेलला निर्विवाद बहुमत मिळवून दिले. त्यामुळं आता अजित पवार हेच मालेगाव कारखान्याचे नवे अध्यक्ष असतील हे स्पष्ट झाले आहे.