कॅबिनेटमध्येच निर्णयाला विरोध करायला हवा होता; आव्हाडांचा अजितदादांना खोचक सल्ला…

कॅबिनेटमध्येच निर्णयाला विरोध करायला हवा होता; आव्हाडांचा अजितदादांना खोचक सल्ला…

Mla Jitendra Awhad : राज्यात सध्या हिंदी भाषा सक्तीवरुन चांगलंच राजकारण तापल्याचं चित्र आहे. पहिलीपासून ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा सक्तीची (Hindi Language Compulsary) करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा अध्यादेश काढून हिंदी भाषा सक्तीची नाही तर तिसऱ्या भाषेचा पर्याय देण्यात आला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी हिंदी भाषेला विरोध करीत हिंदी भाषा पहिली ते चौथी सक्तीची करु नये, अशी भूमिका मांडली. या भूमिकेवर आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बोट ठेवलंय. कॅबिनेटच्या बैठकीतच हा निर्णय झाला तेव्हाच विरोध करायला हवा होता, असा खोचक सल्ला आव्हाड यांनी दिलायं.

अजितदादाच किंगमेकर! ‘माळेगाव’ कारखाना निवडणुकीत 9 उमेदवार विजयी; तावरेंचा पराभव

पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, हिंदी भाषा सक्तीचा निर्णय राज्य सरकारकडून घाईने घेण्यात आला आहे. कोणत्याही गोष्टीची सक्ती विद्यार्थ्यांवर असू नये, ते चुकीचच आहे. कॅबिनेटमध्येच सर्व निर्णय होतात, मग अजित पवार यांनी तिथेच विरोध करायला हवा होता, असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय.

शिंदे गटातील आघाडीचे मंत्री पण, निष्ठा अजून ठाकरे गटाशीच?

तसेच यावेळी बोलताना आव्हाड यांनी महायुतीवरही भाष्य केलंय. महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकमेकांव नजर ठेवूनच आहेत. सत्तेतला एक जण भरत गोगावले यांचा व्हिडिओ व्हायरल करतो. यातूनच कळतं की त्यांचं आपापसांत पटत नाही, पण ते सत्तेत सोबत आहेत, अशी खोचक टीकाही जितेंद्र आव्हाड यांनी केलीयं.

मोठी बातमी! माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत अजित पवारांनी मारली बाजी, वाचा निकाल…

सेक्युलर म्हणता तर माफी मागा!
राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी मुस्लिम समाजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानावरुन चांगलंच राजकारण तापलंय. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमची सेक्युलर भूमिका असल्याचं स्पष्ट केलंय. यावर बोलताना आमदार आव्हाड यांनी तुम्ही स्वत:ला सेक्युलर म्हणता तर मग माफी मागायला हवी, असं विधान केलंय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube