पुणे : जिल्हा परिषद निवडणुकीत मी सुरुवातीला अपक्ष लढलो. त्यावेळी जाहीर सभामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) वरिष्ठ नेते मंगलदास बांदलला अटक करा, टायरमध्ये घाला अशी भाषा करत होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची माझ्या भागात ताकद शुन्य होती. मला त्यावेळी बोलवून आम्हला सहकार्य कर. आपण तुमच्या मिसेसला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी देऊ, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस चे अजित पवार आणि इतर वरिष्ठ नेत्यांनी दिले होते. परंतु, अशा परिस्थितीतही मी तडजोड करून राष्ट्रवादी काँग्रेसला मदत केली. मात्र, एका साध्या केसमध्ये मला अटक करून जेलमध्ये टाकलं. अटक करण्यापूर्वी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा द्यायला लावला, ही एखाद्या प्रामाणिक कार्यकर्त्यांबरोबर एखाद्या पक्षाची वागण्याची पद्धत असू शकते का, असा प्रश्न पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) यांनी उपस्थित करत थेट अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावरच आरोप केले.
शिवाजीराव भोसले सहकारी बँकेची फसवणूक आणि खंडणी प्रकरणात मागील २२ महिने येरवडा जेलमध्ये असलेले मंगलदास बांदल हे नुकतेच जमिनावर तुरुंगातून बाहेर आले. मात्र, बाहेर आल्यावर त्यांनी थेट इशारा देत याचा बदला घेण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शिरूर लोकसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. राजकारण ते जेल अशा सर्वच गोष्टीवर मंगलदास बांदल यांनी ‘लेट्सअप’ शी दिलखुलास संवाद साधला.
संशयित आरोपी हा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री.. पत्रकार वारिसे हत्येप्रकरणी अजितदादांना वेगळाच संशय
मंगलदास बांदल म्हणाले की, माझ्यावर सातत्याने धाडी पडतात हे बरोबर आहे. पण धाडी घालायला कोण सांगते. हे पण पाहणे महत्वाचे आहे. माझे बरेच हितचिंक आहे. त्यामुळे नक्की कोण करतेय, हे येणारा काळच सांगेल. माझ्यावर साधी केस होती. मला सतत जाहीर भाषणामधून अजित पवार हे तुला जेलमध्ये टाकेल, असे गमतीने म्हणायचे. म्हणून त्यांनीच मला जेलमध्ये टाकले की इतर कोणी हितचिंतकांचा यामध्ये हात आहे, हे लवकरच कळेल. पण मला २२ महिने जेलमध्ये ठेवले गेले. हे माझ्याच पक्षातील हितचिंतकांनी हा प्रकार करून अडकवण्याचे काम केले आहे. माझ्यावर अत्यंत साध्या पद्धतीचा गुन्हा होता. मात्र, तरीही षडयंत्र करून मला अडकवण्याचा प्रयत्न झाला आहे. येणाऱ्या काळात मी जनतेच्या दरबारात जाईल. तेथे माझी चूक असेल तर लोकं ठरवतील. बरोबर असेल तर लोकं मला पाठिंबा देतील. त्यामुळे मी घाबरणार नाही. अन्याय झाला तर मी बोलणार, बंडखोरी करणारच असे देखील मंगलदास बांदल यांनी सांगितले.