संशयित आरोपी हा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री.. पत्रकार वारिसे हत्येप्रकरणी अजितदादांना वेगळाच संशय

संशयित आरोपी हा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री.. पत्रकार वारिसे हत्येप्रकरणी अजितदादांना वेगळाच संशय

मुंबई : राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या हत्याकांडाचा मुद्दा मंगळवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनात चांगलाच गाजला. रिफायनरी विरोधात लिखाण केले म्हणून कोकणातील पत्रकार शशिकांत वारिसे यांची हत्या करण्यात आली. वारिसे यांची हत्या करणारा संशयित आरोपी हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे फोटो वापरून रिफायनरीचे समर्थन करत होता. याबाबतचे बॅनरच पवार यांनी सभागृहात दाखवले.

या हत्याप्रकरणाचा योग्य तपास करावा, पोलिसांवर कोणताही दबाव असायला नको, त्यांना तपासासाठी फ्री हँड द्या तसेच त्यांच्या तपासात कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी मागणी पवार यांनी केली.

वाचा : पत्रकार शशिकांत वारिसे प्रकरणाची चौकशी एसआयटी करणार, उपमुख्यमंत्र्यांचे आदेश

कोकणात रिफायनरी विरोधात लिखाण केले म्हणून वारिसे यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील संशयित आरोपी हा रिफायनरीचा समर्थक आहे. त्याने राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे फोटो वापरून रिफायनरीच्या जाहिराती केल्या आहेत. ही बाब अत्यंत गंभीर आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबरोबर फोटो आहे म्हटल्यावर तो त्यांच्या जवळचा आहे का, त्याला कुठे वाचवता येईल का अशा शंकेला वाव राहतो. त्यामुळे या प्रकरणााचा निष्पक्षपणे तपास व्हावा, अशी मागणी पवार यांनी केली.

Sanjay Raut : राज्यात आता झुंडशाही, वारिसे हत्याकांडातील खरे सूत्रधार शोधा; संजय राऊत यांची मागणी

खटला फास्टट्रॅक कोर्टात चालणार

यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की वारिसे यांच्या कुटंबाला 25 लाखांची मदत देण्यात आली आहे. या प्रकरणाच्या तपासावर कोणताही दबाव नाही.दबाव असण्याचे काही कारणही नाही. या प्रकरणातील दोषींना शिक्षा झालीच पाहिजे. तपास झाला की हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालविण्याची विनंती आम्ही न्यायालयाला करणार आहोत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube