Download App

Mangaldas Bandal यांचा अमोल कोल्हेंवर निशाणा! राजांची भूमिका करणारे प्रत्यक्ष तसे वागत नाही!

पुणे : शिरूर लोकसभेचे खासदार (MP) डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) नेहमी म्हणतात की खासदाराने काय दहाव्याला यायचे असते का, तर खासदाराने लोकसभेत बोलायचे असते. मात्र, माझं असं म्हणणं आहे की राजांची भूमिका करणारे खऱ्या आयुष्यात तसे वागत नाही. भूमिका करणारे हे तसे भूमिकेशी समरस होत नाही, असा टोला पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) यांनी शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना लगावला.

शिवाजीराव भोसले सहकारी बँक आर्थिक फसवणूक आणि खंडणीप्रकरणात अटक झाल्यानंतर तसेच तब्ब्ल १६ महिन्यानंतर जेलमधून बाहेर आल्यानंतर मंगलदास बांदल यांनी जेलमध्ये काय काय घडले ते सांगितले आहे. तसेच शिरूर लोकसभा मतदार संघ निवडणुकीत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याशी आलेल्या वितुष्ठा बाबत आपली भूमिका मांडली.

Ajit Pawar : शिंदे-फडणवीसाकडून फक्त सरकार टिकवण्यासाठी धडपड!

मंगलदास बांदल म्हणाले की, एखाद्या मालिकेत, चित्रपटात नुसती भूमिका करून चालत नाही. खासदार कोल्हे म्हणायचे की खासदाराने संसदेत बोलायचे असते, दहाव्या यायचे नसते. मात्र, डॉ. कोल्हे हे प्रत्यक्षात तसे वागत नाही. ते संसदेतही बोलत आहे. आणि मतदार संघात दहाव्यालाही येत असतात. त्यामुळे ते जे बोलतात तसे वागत नाही, असेच दिसत आहे.

शिरूर लोकसभा मतदार संघात डॉ. अमोल कोल्हे हे इतके काम करत आहे की त्यांना संसदेने ठराव करून तहहयात खासदार केले पाहिजे, अशी उपरोधक टीका करत मंगलदास बांदल म्हणाले की, शिरूरमध्ये डॉ. कोल्हे इतके कामं करत आहेत की त्यांना पाच वर्षे पूरणार नाही. त्यामुळे त्यांना तहहयात खासदार बनवले पाहिजे. कारण त्यांना शिरूरची इतकी काळजी आहे.

Tags

follow us