Download App

Mangaldas Bandal : मी बंड करणारच… लोकं माझं मूल्यमापन करतील!

पुणे : रांजणगाव एमआयडीसीत (MIDC) मी कधीही दादागिरी केली नाही. तसेच कोणत्याही कंपनीकडून हप्ते मागितलेले नाही. तिथले स्थानिक गुंड राजकीय पुढऱ्यांच्या मदतीने मोठे झाले आहेत. मात्र, मी कधीही असे प्रकार केले नाही. माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे. तसेच माझं लोकांशी बोलणे चांगले आहे. त्यामुळे लोकं माझ्यामागे आहेत. म्हणूनच मी पक्षांकडे जेव्हा उमेदवारी मागतो. तेव्हा पक्षाने योग्य मूल्यमापन करावे. नाहीतर मी बंडखोरी करणारच आहे. लोकं माझं मूल्यमापन करतील, असा इशाराच पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) यांनी दिला आहे.

शिवाजीराव भोसले सहकारी बँक आर्थिक फसवणूक आणि खंडणीप्रकरणात अटक झाल्यानंतर तसेच तब्ब्ल १६ महिन्यानंतर जेलमधून बाहेर आल्यानंतर मंगलदास बांदल यांनी जेलमध्ये काय काय घडले ते सांगितले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना शिरूर तालुक्यातील विशेषतः रांजणगाव एमआयडीसीतील राजकारणाबाबत सविस्तर सांगितले.

Sharad Pawar : माझ्या जन्माच्या तिसऱ्या दिवशीच आईने मला सभागृह दाखवलं!

मंगलदास बांदल म्हणाले की, रांजणगाव एमआयडीसीत गुंडगिरी करून अनेक जण कोट्याधीश झाले आहेत. मी कधीही कोणाला धमकावून खंडणी किंवा हप्ते मागितले नाही. माझ्या बंडखोर वृत्तीमुळे काही लोकं माझ्याबाबत बोलत असतात. पण त्यात काही तथ्य नाही. मी जे आहे तो रोखठोक आहे. लोकांमध्ये फिरणारा आहे. मी पैलवान असल्याने पैलवानी भाषेत बोलतो. त्यामुळे अनेकांना ते पटत नाही. त्याला मी काही करू शकत नाही.

माझा लोकांमध्ये जनसंपर्क चांगला आहे. मी लोकांची कामं करतो. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदार संघातील जनता माझ्या पाठीशी आहे. माझी ताकद असल्यानेच मी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. पक्ष हा मूल्यमापन करण्यासाठी असतो. पक्ष जर माझं मूल्यमापन करणार नसेल तर मी बंडखोरी करणारच ना. त्यामुळे मी कोणालाही घाबरत नाही. लोकं माझं मूल्यमापन करतील असे सांगत आपण यापुढे बंडखोरपणेच वागणार असल्याचा मंगलदास बांदल यांनी एक प्रकारे इशाराच दिला आहे.

Tags

follow us