Download App

I AM VERY HAPPY म्हणणाऱ्या माणिकराव कोकाटेंनी धाडली पवारांच्या नातवाला नोटीस

  • Written By: Last Updated:

Manikrao Kokate Sent Defamation Notice To Mla Rohit Pawar : विधानसभेत रमी खेळतानाचा व्हिडिओ पोस्ट करून जगजाहीर केल्याप्रकरणी तत्कालीन कृषिमंत्री आणि विद्यामान क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी शरद पवारांचे नातू आणि आमदार रोहित पवारांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. याबाबत खुद्द रोहित पवारांनी एक्सवर माहिती देत आलेल्या नोटिशीचे फोटो पोस्ट केले आहे. तसेच कोकाटेंना प्रत्युत्तरही दिले आहे. ज्यात तुम्ही पाठवलेली नोटीस मजेशीरअसल्याचे रोहित पवारांनी (Rohit Pawar) म्हटले आहे. तसेच लक्षात ठेवा, पुराव्याशिवाय मी बोलत नाही. तुम्ही पत्ते खेळत होतात हे मी पुराव्यासकट प्रुफ केलं होतं आणि उद्या देखील पुराव्यासकट प्रुफ करेल असे रोहित पवारांनी म्हटले आहे.

 

त्यामुळे एवढे मोठे कांड करूनही वाचलात

माजी कृषिमंत्र्यांचा सभागृहात पत्ते खेळतानाचा व्हिडीओ जगजाहीर केला म्हणून मला मानहानीच्या दाव्याची नोटीस आलीय. कोकाटे साहेब तुमचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती, त्यामुळे एवढे मोठे कांड करूनही वाचलात. मानहानीची एवढी काळजी होती तर पत्ते खेळण्याचे कुटाणे केलेच कशाला? शेतकऱ्यांप्रती असलेला आपला कळवळा आणि आपण केलेले पराक्रम सांगण्याची वेगळी गरज नाही. तुम्ही पाठवलेली नोटीस मजेशीर आहे, नोटीस वाचून हसू आवरता आले नाही. पण लक्षात ठेवा, पुराव्याशिवाय मी बोलत नाही. तुम्ही पत्ते खेळत होतात हे मी पुराव्यासकट प्रुफ केलं होतं आणि उद्या देखील पुराव्यासकट प्रुफ करेल.

रमी खेळण्याच्या व्हिडिओनंतर कोकाटेंचा राजीनामा

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात माणिकराव कोकाटेंचा रमी खेळताना व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर विरोधकांकडून कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. अखेर कोकाटेंनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. मात्र, त्यांना महायुती सरकारने अभय देत क्रीडा खात्याचे मंत्री बनवले. त्यानंतर कोकाटेंनी सरकारने जो निर्णय घेतला आहे, तो मला मान्य असून, कृषिखात्यासंदर्भात दत्तात्रय भरणेंना काही मदत लागली तर, मी नक्की करेन आणि त्यांची मला मदत लागल्यास मी घेईन, असंही कोकाटे म्हणाले होते. तसेच नवीन खातं आवडलं का?, असं कोकाटेंना विचारताच I AM VERY HAPPY, असं उत्तर माणिकराव कोकाटेंनी दिले होते.

follow us