‘शरद पवारांनी चावी दिली की, मनोज जरांगेंचं इंजिन टूक टूक करत’; ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची टीका

Navnath Waghmare Criticize Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी 29 ऑगस्टला चलो मुंबईचा नारा दिलाय. यावर बोलताना ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी (Navnath Waghmare) म्हटलं की, जरांगे जात आहेत. परंतु पहिल्याप्रमाणे वाशीपासून परत येऊ नये. जरांगे जाणार नाहीत. शरद पवारांनी चावी दिली की, मनोज जरांगेंचं इंजिन टूक टूक करत राहतं. त्यामुळे जरांगेंना पुढे करून सरकारमध्येच राहून सरकारला वेठीस धरण्याचं काम एकनाथ शिंदे (Eknath Shinde) करीत आहेत. परंतु याचे मूळ मात्र शरद पवार (Sharad Pawar), राजेश टोपे आणि कॉंग्रेसमधील काही खासदार-आमदार आहेत. त्यामुळे ही पावसाळ्यात उगवलेली तात्पुरती छत्री म्हणायची. दोन-पाच दिवसांसाठी ही नक्कीच मोडली जाईल.
पावसाळ्यात उगवलेली तात्पुरती छत्री
मनोज जरांगेला जरी मुख्यमंत्री केलं तरी, मराठा समाजाला काही मिळणार नाही, असा टोला नवनाथ वाघमारे यांनी लगावला आहे. मोठमोठ्या नेत्यांची वल्गना करता. त्यांची मागणी असंविधानिक आहेत. त्यांना काही मिळणार नाही. त्यानंतर मराठा समाज त्याला बुटाड्याने मारल्याशिवाय सुस्त बसणार नाही, अशी देखील टीका नवनाथ वाघमारे यांनी केली आहे.
कोकाटेंनी पवारांच्या नातवाला धाडली नोटीस; उत्तर मिळालं, पाठवलेली नोटीस मजेशीर पण….
मराठा समाज भावनिक
जरांगेंना मुंबईला जायचंच नाही. परंतु त्यांना थांबवण्यासाठी कोणी येतच नाही. प्रताप सरनाईक आले होते. त्यांना एकनाथ शिंदे यांनी पाठवलं होतं. परंतु ते थांबवण्यासाठी नाही, तर रसद पुरविण्यासाठी आले होते. इतकं नाटकं करणारं माणूस मी पाहिलेला नाही, असं देखील वाघमारे यांनी म्हटलंय. मराठा समाज भावनिक आहे. त्याचा फायदा मनोज जरांगे घेत असल्याचा आरोप नवनाथ वाघमारे यांनी केला आहे.
जुन्या वाहनधारकांसाठी मोठी खुशखबर! 20 वर्षांपर्यंत वाढणार रजिस्ट्रेशन, सरकारचे नवे नियम जाहीर
माळी समाजाविषयी असणारी खदखद
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर बोलताना ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी म्हटलंय की, लक्ष्मण हाके यांची माळी समाजाविषयी असणारी खदखद त्या व्हिडिओतून बाहेर पडली आहे. व्हिडिओ मॉर्फ केलेला नाही. माळी समाज खूप मोठ्या मनाचा आहे. हाकेंनी दिलगिरी व्यक्त केल्यास त्यांना माफ करेल. परंतु त्यांनी उगाच रेटून नेण्याचं काम करू नये.