पुणे : पुणे महानगरपालिकेमध्ये (Pune Municipal Corporation) नव्याने समाविष्ट झालेल्या मांजरी गावातील (Manjari village) ग्रामस्थ आणि भाजप (BJP) कार्यकर्त्यांनी आज (ता. 27 मार्च) पुणे महानगरपालिकेवर आक्रमक पवित्रा घेत आंदोलन पुकारलेले पाहायला मिळालं.
पुणे पालिकेमध्ये समाविष्ट झाल्यापासून कोणत्याच सोयीसुविधा गावाला मिळाल्या नाहीत. तसेच, विविध दाखले कागदपत्रे काढण्यासाठी देखील नागरिकांना मोठा संघर्ष करावा लागत आहे. अशा विविध मागण्यांसाठी प्रशासनाच्या विरोधात आजचा मोर्चा काढला होता. तसेच दीड वर्षापासून पालिकेमध्ये समाविष्ट होऊन देखील काहीच फायदा नसल्याने आमची ग्रामपंचायतच बरी होती, असं मत यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केलं आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात