Download App

मोठी बातमी : बोलताना तारतम्य बाळगा; समज देत पुणे कोर्टाकडून जरांगेंचं अटक वॉरंट रद्द

यावेळी कोर्टाने जरांगेंना बोलताना काळजी घ्या अशी समजही देण्यात आली आहे.

  • Written By: Last Updated:

पुणे : मराठा आंदोलक मनोज जरांगेंना (Manoj Jarange) मोठा दिलासा मिळाला असून, नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्यापरकरणी जारी करण्यात आलेले अटक वॉरंट पुणे न्यायालयाने (Pune Court) रद्द केले आहे. यावेळी कोर्टाने जरांगेंना बोलताना काळजी घ्या अशी समजही देण्यात आली आहे. (Manoj Jarange’s Arrest Warrant Canceled By Pune Court)

महायुती-मविआ दोघांनी मिळून आरक्षण द्या अन्यथा..; मनोज जरांगेंचा नवा इशारा काय?

नेमकं प्रकरण काय?

एका नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी जरांगेंच्या विरेधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर अनेकदा कोर्टात हजर राहण्याचे समन्स बजावूनही ते कोर्टात हजर राहिले नव्हते. त्यानंतर पुणे कोर्टाने काही दिवसांपूर्वी जरांगेंविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. आज या प्रकरणावर सुनावणी होती. त्यावेळी जरांगे पुणे कोर्टात हजर राहिले.

मनोज जरांगेंची मोठी घोषणा; 288 मतदारसंघात देणार उमेदवार, राजकीय पक्षांना घाम फोडणार

सुनावणीवेळी कोर्टाने जरांगेंचा अटक वॉरंट रद्द करत असल्याचे सांगत त्यांना समजही दिली. तसेच जरांगेंनी जे बंद पत्र कोर्टाला पाठवले होते त्याची रक्कम जी आहे ती भरणं आवश्यक आहे आणि नव्याने बंद पत्र सादर करणे आवश्यक असल्याचे नमुद केले आहे. जोपर्यंत बंद पत्राची रक्कम जरांगेंकडून भरली जात नाही आणि नवीन बंद पत्र सादर केले जात नाही तोपर्यंत अटक वॉरंट रद्द करता होणार नाही असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

मी दिलेल्या उमेदवाराला मतदान करा, दगड असेल तरी निवडून द्या; जरांगेंनी क्लिअरच केलं

अवमान होईल अशी वक्तव्य करणं टाळा

अटक वॉरंट रद्द करताना न्यायालयाने जरांगेंना समजही दिली. न्यायालय म्हणाले की, समाजमाध्यमात बोलताना कोर्टाचा अवमान होईल अशी वक्तव्य टाळणे आवश्यक आहे. अन्यथा कोर्टाचा अवमान होईल अशी वक्तव्य केली तर, भारतीय न्याय संहितेच्या नव्या कलमानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल होणं आवश्यक आहे. मात्र, न्यायालयाने जरांगेंना बोलताना काळजी घ्या अशी समज दिली आहे.

follow us