Download App

आरक्षणासाठी उद्यापासून कामाला लागा; जरांगे पाटलांनी पुन्हा पेटवलं रान

  • Written By: Last Updated:

Manoj Jarange Patil : गेल्या महिन्याभरापासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यासह मराठा समाज मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) आक्रमक झाला आहे. मात्र, अद्याप मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही. त्यामुळं आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. ते राज्यात ठिकठिकाणी सभा घेत आहेत. अंतरवली सराटी गावात सभा घेतल्यानंतर त्यांची आज राजगुरूनगऱमध्ये भव्य सभा झाली. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

ड्रग्ज प्रकरणात सत्ताधारी आमदारांना १६ लाखांचा हप्ता मिळतो; संजय राऊतांचा दावा 

काल सुनील कावळे या तरुणाने मराठा आरक्षणसााठी टोकाचं पाऊल उचललं. गळफास घेत या तरुणाने जीवन संपवलं. यावरून जरागेंनी सरकारवर टीका केली. सभेत बोलतांना ते म्हणाले की, सरकार सोडता आमच्यावर अन्याय करायला कुणीच तयार नाही. सुनील कावळेच्या आत्महत्येमुळं मराठ्यांवर दुखाचा डोंगर कोसळला. आतापर्यंत १४ ते १५ बांधवांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्या. या आत्महत्यांना सरकारच जबाबदार आहे. कारण, सरकारने लवकर आरक्षण दिलं असतं ह्या आत्महत्या झाल्या नसत्या, असं जरांगे म्हणाले.

ते म्हणाले, आंतरवलीतील सभा झाल्यानंतर वाटलं पुढच्या सभांना गर्दी होणार नाही, असं काहींना वाटलं. पण, इथं येऊन बघा नजर पुरणार नाही इतकी गर्दी आहे, असं जरांगे म्हणाले. ज्यांनी मराठा आरक्षणासाठी आपलं बलिदान दिलं, त्याचं त्यांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही. त्यांच्या लेकराला मराठा समाज कधीच माया कमी पडू देणार नाही. आता आरक्षण घेतल्याशिवाय, माघार नाही. एक इंचही मागे हटणार नाही, असा निर्धारत्यांनी व्यक्त केला.

आपण मोर्चे खूप काढले. पण, आपण आरक्षण समजून घेतलं नाही. ठराविक लोकांनीच आरक्षण सजमू घेतलं. घराघरातील लोकांनी आरक्षण समजून घेतलं पाहिजे, असं जरांगे म्हणाले.

आता ठोकायचं अशी एका मराठ्याची भावना होती. मात्र, शांततेच्या मार्गानेच आरक्षण मिळवून देऊ, असा आपला शब्द आहे. आता आरक्षणचा मुद्दा निर्णय प्रक्रियेत आला. एकदा का प्रशासनाला कागद दिला तर मनोज जंरागे कार्यक्रमच करतो, टप्यात आला की, सोडतचं नाही. मराठ्यांच्या नादी लागू नका. हे युध्द रोखण्याची ताकद देशात आणि राज्यात कोणातच नाही, असा इशाराही जरांगें दिला.

 

 

Tags

follow us