Manorama Khedkar : वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्या आई मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) यांनी पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Police) अटक केली होती. खेडकर यांची पोलीस कोठडी आज संपत असतांना त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी कोर्टाने मनोरमा खेडकर यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली. दरम्यान, या सुनावणीमध्ये मनोरम खेडकर यांनी पुणे पोलिसांवर आरोपही केले आहेत.
शरद पवार-अजित पवार एकत्र येतील; पण काही महत्वाकांक्षी नेत्यांना…सुनिल शेळकेंचा रोख कुणाकडं?
मनोरमा खेडकर यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे कलम 307 वाढवण्यात आले आहे. आधी फक्त शेतकऱ्यांना धमकावल्याचा गुन्हा दाखल झाला होता. नवीन कलम जोडल्यामुळं खेडकर यांच्या अडचणीत वाढ झाली. आज मनोरमा खेडकर यांना पौडच्या न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी सरकारी पक्षाने दोन दिवस पोलीस कोठडी वाढवून मागितली होती. त्याला आरोपीच्या वकीलांना विरोध केला होता.
युक्तावाद करताना सरकारी वकील अमर ननावरे म्हणाले की, मनोरमा खेडकर यांचे साथीदार तसेच घटनास्थळावरील कंटेनर संबंधी तपास करायचा आहे. त्यासाठी खेडकर यांना पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. आरोपीने तक्रारदारांच्या डोक्याला पिस्तूल लावलं होतं आणि जीवे मारण्याची धमकी दिली होती, असा दावाही सरकारी वकिलांनी केला.
जरांगेंना धसका साडे सात लाख हरकतींचा? उपोषणाचे मूळ इथेच आहे…
तर आरोपीचे वकील सुधीर शहा यांनी युक्तीवाद केला की, या प्रकरणांमध्ये जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे कलम 307 लागू होत नाही. ते कलम काढून टाकावे. उर्वरित कलमे जमीनपात्र आहेत. त्यामुळे पोलीस कोठडी वाढवण्यात येऊ नये.
दरम्यान. दोन्ही युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टाने मनोरमा खेडकर यांची पोलीस कोठडी दोन दिवसांनी वाढवली
सुनावणी दरम्यान मनोरमा खेडकर यांनी त्यांना वेळेवर खायला दिले जात नसल्याची तक्रार कोर्टासमोर केली. मला सकाळी चहा उशिरा दिला, त्याचप्रमाणे दुपारचे जेवणही उशिरा दिले. मी ज्या रुममध्ये झोपतेत, ती रुम ओसली असल्याची तक्रारही मनोरम खेडकर यांनी केली. त्यावर कोर्टाने सीसीटीव्ही फुटेज न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
मनोरमा खेडकर यांची कार जप्त
मनोरमा खेडकर यांनी मुळशी तालुक्यातील धडवली गावातील शेतकऱ्यांना धमकी देण्यासाठी जातांना वापरण्यात आलेली कार पोलिसांनी जप्त केली आहे. जमिनीच्या वादातून मनोरमा खेडकर यांनी मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांना पिस्तूल दाखवून धमकावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यावेळी त्यांनी ज्या टोयोटा कारचा उपयोग केला होता, ती कार पोलिसांनी जप्त केली.