Download App

फिर एक बार सुनील अण्णा मावळचे आमदार..?, भाजप पदाधिकारी शेळकेंच्या बाजूने…

भाजप पदाधिकाऱ्यांनी सुनील शेळके यांची भेट घेत अण्णा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, विजय आपलाच, असा शब्द देत कामाला लागले आहेत.

  • Written By: Last Updated:

मावळ : मावळ विधानसभा मतदारसंघात (Maval Assembly Constituency) 2019 च्या निवडणुकीत राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी मावळमध्ये एक नवा रेकॉर्ड केला होता. आता सुरू असलेल्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत सुनील शेळके यांच्या विरोधात त्यांना रोखण्यासाठी महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) उमेदवारही मिळाला नाही. अखेर त्यांना बापू भेगडे (Bapu Bhegade) या अपक्ष उमेदवाराला समर्थन द्यावं लागलं आहे.

आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून विजयाकडे वाटचाल; मोठ्या प्रतिसादानंतर निलंगेकर यांचा वाढला विश्वास 

मावळमध्ये बापू भेगडे यांच्या समर्थनासाठी भाजपचे बाळा भेगडे, रवींद्र आप्पा भेगडे आदी मंडळींनी समर्थन दिलं असलं तरी ग्राउंडवरील भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी महायुतीचा धर्म पाळत मावळचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांच्या बाजूने भक्कमपणे उभे असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामध्ये तळेगाव दाभाडेचे शहराध्यक्ष संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील व अन्य पदाधिकाऱ्यांनी सुनील शेळके यांची भेट घेत अण्णा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, विजय आपलाच, असा शब्द देत कामाला लागले आहेत.

आमच्याकडे घोषणापत्र तर काँग्रेसकडे घोटाळापत्र, मोदींचा नाशिकमधून विरोधकांवर हल्लाबोल 

मावळ विधानसभा मतदारसंघांमध्ये सुनील शेळके हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. यामुळे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीनही प्रमुख पक्षाचे स्थानिक पदाधिकारी शेळके यांच्या प्रचाराला लागली असल्याने शेळके आणि प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

दुसरीकडे अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांना महाविकास आघाडीने पाठिंबा जाहीर केला असला तरी बापू भेगडे निवडून आल्यानंतर कुणाला पाठिंबा देणार? हे कन्फ्युजन मतदारांमध्ये आहे. शिवाय अधिकृत पक्षाची निशाणी नसल्याने त्यात अजूनच भर पडत आहे.

भाजप नेते बाळा भेगडे आणि रवींद्र आप्पा भेगडे यांनी जरी बापू भेगडे यांचं खुलं समर्थन केलं असल तरी त्यांच्यासोबत भाजपचा पारंपरिक मतदार जाण्याची शक्यता फारच कमी दिसत आहे. भाजपा शिस्त पाळणारा पक्ष म्हणून ओळखला जातो, यामुळे भाजपचे मतदार हे महायुतीचाच धर्म पाळतील आणि सुनील शेळके यांना पुन्हा एकदा आमदार करतील, असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

दरम्यान, बापू भेगडे अपक्ष निवडणूक लढवत असले तरी निवडून आल्यानंतर कुणाला समर्थन देणार यामध्ये स्पष्टता नसल्याने महाविकास आघाडीचे मतदार असो किंवा बाळा भेगडे आणि रवींद्र भेगड यांचे समर्थक कन्फ्युज आहेत. दुसऱ्या बाजूला महायुतीचे उमेदवार शेळके यांच्याकडे अधिकृत पक्षाची निशाणी आहे. या गोष्टी शेळके यांच्या पथ्यावर पडणाऱ्या आहेत. मावळात रंगतदार लढत होईल अशा चर्चा रंगवल्या जरी जात असल्या तरी सुनील शेळके यांची गेल्या निवडणुकीतील ताकद आणि मताधिक्य पाहता अपक्ष उमेदवाराचा किती टिकाव लागेल हे आजघडीला सांगणं अवघड आहे.

गेल्या निवडणुकीत सुनील शेळके यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार बाळा भेगडे हे स्वतः उभे होते. त्यांचा सुमारे 94 हजार या विक्रमी मताधिक्याने शेळके यांनी पराभव केला होता. आता तर बाळा भेगडे हे उमेदवार देखील नाहीत आणि भाजप मतदारही त्यांच्यासोबत नाही त्यामुळे ते बापू भेगडे यांच्या किती कामे येतील? यावर उपरोधिक चर्चा रंगू लागल्या आहेत.

दरम्यान, शेळके यांना दिवसेंदिवस भाजप पदाधिकाऱ्यांचा मिळणारा पाठिंबा, राष्ट्रवादी, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी (अ) यांची साथ आणि व्यक्तिगत ताकद पाहता सुनील शेळके यांच्यासाठी मावळची लढाई एकतर्फी असल्याचा चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे. मात्र मतदानाला अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. त्यामुळे घोडा मैदान समोर आहे. त्यामुळे पुढे मावळात काय ट्विस्ट येतो हे पाहणं अवचुक्याचं ठरणार आहे.

follow us