मावळात सुनील शेळकेंचे हात बळकट, शिवसेना खासदाराचा जाहीर पाठिंबा…

  • Written By: Published:
मावळात सुनील शेळकेंचे हात बळकट, शिवसेना खासदाराचा जाहीर पाठिंबा…

Vidhansabha Election : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार (Ajit Pawar) गटात फूट पडली. संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापू भेगडे (Bapu Bhegade) यांनी विद्यमान आमदार सुनील शेळके यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यामुळं सुनील शेळके एकटे पडले आहेत. दरम्यान, आता खासदाश्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी महायुतीचा धर्म पाळत आम्ही सुनील शेळकेंना पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं.

ठरलं तर, मतदारसंघ अन् उमेदवार ‘या’ दिवशी जाहीर करणार; मनोज जरांगेंची घोषणा 

मावळमध्ये अजित पवार यांनी विद्यमान आमदार सुनील शेळके यांना उमेदवारी दिली आहे. त्यानंतर नाराज असलेल्या बापू भेगडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यापाठोपाठ महायुतीचे नेते आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनीही राजीनामा देऊन अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांना पाठिंबा जाहीर केला. याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटानेही अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांना पाठिंबा दिलाय. त्यामुळे शेळके यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

‘मी माफी मागते’, उत्तर देवेंद्र फडणवीसांना द्यावे लागेल, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 

दरम्यान, या सगळ्या स्थितीत मावळचे खासदार श्रीरंग बारणे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. अशातच आता वडगाव मावळ येथे शिवसेनेची बैठक त्यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी खासदार बारणे यांनी महायुतीचा धर्म पाळत आम्ही सुनील शेळकेंना पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं.

ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीचा धर्म सर्वांना पाळावा, असं आवाहन केलं. त्यानुसार आम्ही युतीचे काम करू. लोकसभा निवडणुकीत भाजप प्रामाणिकपणे आमच्या पाठीशी उभा राहिला. मात्र, राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी युती धर्माचे पालन केलं नाही. तसेच माझ्या कामाबद्दल काही जणांनी हिणवण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळं सेनेच्या कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र होत्या. त्यांनी लोकसभा निवडणुकीत जे सोसले, पाहिले त्यानुसार त्यांनी त्यांच्या भावना बैठकीत मांडत नाराजीचा सुरू देखील व्यक्त केला. मात्र, राज्यात महायुती असल्याने आम्ही निवडणुकीत युतीच्या नेत्याचं काम करण्याचं ठरवलं, असं बारणे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube