‘संभाजी झेंडेंना उमेदवारी देणं ही वैचारिक दिवाळखोरी, स्वाभिमान कुठं…’; अजितदादांवर शिवतारे संतापले

  • Written By: Published:
‘संभाजी झेंडेंना उमेदवारी देणं ही वैचारिक दिवाळखोरी, स्वाभिमान कुठं…’; अजितदादांवर शिवतारे संतापले

Vijay Shivtare : शिंदे गटाचे नेते विजय शिवतार (Vijay Shivtare) पुरंदर विधानसभा मतदारसंघातून (Purandar Assembly Constituency) निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिवतारेंनी लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवारांना (Sunetra Pawar) पाठिंबा दिला होता. मात्र, आता अजित पवारांनी (Ajit Pawar) विधानसभेसाठी शिवतारे यांच्याविरोधात संभाजी झेंडेंना उमेदवारी दिली आहे. यावर विजय शिवतारेंनी भाष्य केलं.

शेतकरी, युवकांसाठी काम करणार; वळसे पाटलांची मतदारांना ग्वाही 

सुनेत्रा पवारांना पाडण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या झेंडे यांना उमेदवारी देणे ही वैचारिक दिवाळखोरी असून त्यांना उमेदवारी देतांना स्वाभीमान कुठं ठेवला होता, असा सवाल शिवतारेंनी केला.

लोकसभेला अजित पवारांनी केलेली टीका लक्षात ठेवत शिवतारेंनी बारामतीतून निवडणूक लढवण्याची भुमिका घेतली होती. पवार कुटुंबाच्या विरोधात असलेली मतं आपल्याला पडणार आणि आपण या निवडणुकीत विजयी होणार, असा विश्वास शिवतारेंना होता. मात्र, अजितदादांनी फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना मध्यस्थीने शिवतारेंचे बंड थांबवलं होतं. तेव्हा अजित पवारांनी शिवतारेंना विधानसभेवर पाठविण्याचा शब्द दिला होता. मात्र, आता लोकसभेला मदत करूनही अजित पवार यांनी पुरंदरमधून शिवतारेंविरोधात उमेदवार कसा दिला असा प्रश्न निर्माण झाला.

महायुतीची सदा सरवणकरांना मोठी ऑफर, अमित ठाकरेंचा मार्ग मोकळा होणार? 

दरम्यान, यावर बोलतांना शिवतारे म्हणाले, बारामती लोकसभा मतदारसंघातून माघार घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी पुरंदरचा किल्लेदार विधानसभेमध्ये पाठवा, असा शब्द तिन्ही नेत्यांसमोर दिला होता. असं असूनही संभाजी झेंडे यांची उमेदवारी का जाहीर केली? निष्ठावंत राष्ट्रवादी नेत्याला संधी दिली असती तरी मला चाललं असतं. पण, सुनेत्रा पवारांना पाडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्याला उमेदवारी देताना स्वाभिमान कुठं ठेवला? असा सवाल शिवतारेंनी उपस्थित केला.

ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात ज्याने सुनेत्रा पवारांना पाडण्याचा प्रयत्न केला, त्यालाच अजितदादांनी तिकीट दिल्याबद्दल मला आश्चर्य वाटतं. संभाजी झेंडे यांनी सुनेत्रा पवारांना पाडण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली होती. त्यांनाच उमेदवारी देणं ही वैचारिक दिवाळखोरी आहे, असंही शिवतारे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube