जनतेकडून मला मिळणार प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालाची वाळू सरकली, सुनील शेळकेंचा हल्लाबोल

प्रत्येक गावात मतदारांकडून मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसादामुळं विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली. -सुनील शेळके

Sunil Shelke

Sunil Shelke

Sunil Shelke : राज्यात विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election) रणधुमाळी सुरू आहे. अशातच आता मावळ मतदारसंघाचे (Maval) अजित पवार गटाचे उमेदवार सुनील शेळके (Sunil Shelke) यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री दहानंतर प्रचार सुरु ठेवल्याने त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला. यावरून आता सुनील शेळकेंनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

तानाजी सावंतांचा संवाद दौरा; प्रचारातून दिला विकासाचा शब्द

आपल्या प्रचार दौऱ्यात प्रत्येक गावात मतदारांकडून मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसादामुळं विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यामुळं त्यांनी खोट्या तक्रारी दाखल करण्यास सुरूवात केली, असा शब्दात शेळकेंनी विरोधकांवर निशाणा साधला.

आमदार शेळके यांनी जाहीर प्रचाराची वेळ संपल्यानंतरही आढले खुर्द व चांदखेड येथे रात्री प्रचार केल्याची तक्रार विरोधकांकडून शिरगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. त्याबाबत आमदार शेळके यांनी प्रतिक्रिया देतांना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. शेळके म्हणाले की, गेल्या पाच वर्षात केलेली विकासकामे आणि नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे मला प्रत्येक गावात मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. समोर पराभव दिसू लागल्याने जनतेच्या दरबारात लढण्याऐवजी त्यांनी पोलीस स्टेसनची पायरी चढली, यावरून त्यांचे मनोधैर्य पूर्णपणे खचले, असं शेळके म्हणाले.

मोठी बातमी! महायुतीचे उमेदवार संभाजीराव पाटील निलंगेकर यांना कोळी महासंघाचा जाहीर पाठिंबा 

पुढं शेळके म्हणाले, लोक मला भेटायला उत्सुक आहेत. लोक माझ्या येण्याची वाट पाहत तासनतास थांबतात. मी आल्यानंतर माझ्याशी संवाद साधतात. उमेदवार म्हणून मी निवडणुकीचे सर्व नियम पाळत आहे. विरोधकांनी तांत्रिक मुद्दे उपस्थित करून, खोटे-नाटे आरोप करून जनतेची दिशाभूल करू नये, असे आवाहन आमदार शेळके यांनी केले.

विरोधकांच्या असल्या खेळीला मी फारसे महत्व देत नाही. मावळची जनता येत्या 20 तारखेला विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, असं ते म्हणाले.

Exit mobile version