दीपक साळुंखे ‘मशाली’वर सांगोला विधानसभा लढणार? शेकाप बंडखोरीच्या तयारीत…
Deepak Salunkhe : विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election) घोषणा होताच राजकीय घडामोडी वेगाने सुरु झाल्या. महायुतीतून (Mahayuti) अनेक नेते महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) प्रवेश करत आहेत. आता सोलापूरचे अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखेंनी (Deepak Salunkhe) ठाकरे गटाकडून (UBT) उमेदवारी मिळत असल्यानं मशाल हाती घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण होण्याची शक्यता आहे.
महिला स्वच्छेने आश्रमात; सदगुरू जग्गी वासुदेव यांच्या ईशा फाऊंडेशनला SC चा दिलासा!
राष्ट्रवादीचा राजीनामा दिलेले साळुंखेंनी आज ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं. आपल्याला उमेदवारीची खात्री असल्याचं ते सांगत आहे. त्यामुळे ही जागा शिवसेनेला सुटली तर महाविकास आघाडीत पुन्हा बिघाडी होण्याची शक्यता आहे. कारण शेतकरी लोकसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाने माढा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काम केलं होतं. विधानसभेला सांगोल्याची जागा शेकापला सोडण्यात येईल, असं सांगण्यात येतं होतं. त्यामुळे महाविकास आघाडीत सांगोला मतदारसंघ शेकापकडे जाईल, असं बोलल्या जातं होतं.
महायुतीत लहान पक्षांचा टिकाव लागणं अवघड, वापरा, फोडा अन्…; जानकरांची सडकून टीका
दरम्यान, , गेल्या दोन दिवसांत घडलेल्या घटनांमुळे सांगोल्याबाबत महाविकास आघाडीत वाद निर्माण होऊ शकतो. साळुंखे यांच्यासाठी शिवसेनेने ज्या प्रकारे पायघड्या घातल्या आहेत, ते पाहता सांगोल्याची जागा शिवसेनेच्या खात्यात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली.
दुसरीकडे महाविकास आघाडीशी एकनिष्ठ असलेल्या शेकापने सांगोला मतदारसंघातून दावा केला. सांगोला हा शेकापचा बालेकिल्ला आहे. येथून बाबासाहेब देशमुख आणि अनिकेत देशमुख हे दोन्ही बंधू शेकापकडून लढण्यासाठी इच्छुक आहेत.
आता दीपक साळुंखेंनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली. त्यामुळं आता शेकाप काय निर्णय घेतं? हेच पाहणं महत्वाचं आहे.